राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दिनांक १ मे 2023 रोजी पासून कार्यरत होणार आहे. ग्रामीण भागात, शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागांपासून तसेच झोपडपट्टी वस्तीनपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असणे, नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे काही झोपडपट्ट्यातील सदृश्य भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहे. तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून आरोग्य निर्देशांक वाढविण्याकरिता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची स्थापना करण्यात येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये नागरिकांना विविध आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहेत. यामध्ये बाह्य रुग्ण सेवा वेळ दुपारी २:०० ते रात्री १०:०० पर्यंत, मोफत औषध उपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेली कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी व लसीकरण तसेच महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्ययंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा आवश्यकतेनुसार व विशेष तज्ञ संदर्भ सेवा इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली भेरे नगर ता.शाहापुर, राहुल नगर ता.अंबरनाथ आणि संभाजी नगर ता. मुरबाड तसेच महानगरपालिका क्षेत्रातील मिळून एकूण 9 ठिकाणी आपला दवाखाना सुरू होणार आहे.
°°°°