विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे

तीन दिवसात तब्बल एकूण १७ लाख, ५३ हजार, १३५ रुपये नफा
ठाणे:जिल्हा परिषद ठाणे मार्फत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील “विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री” आयोजित करण्यात आले होते. दि.०१/०३/२०२४ ते दि.०३/०३/२०२४ दरम्यान धर्मवीर आनंद चिंतामणी टॉवर मैदान, ठाणे येथे विभागीय सरस प्रदर्शन व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्रीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आहे. तीन दिवसाच्या प्रदर्शन व विक्रीस तब्बल एकूण १७ लाख, ५३ हजार, १३५ रुपये नफा महिला बचत गटांना झाला असल्याची माहिती मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. छायादेवी शिसोदे यांनी दिली.



विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीस ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या स्वयं साहाय्यता गटांना मोबदला चांगला मिळाला आहे. आमच्या फुड स्टॉलवर नागरिकांनी चागंलाच प्रतिसाद दिला आहे आणि आमचा तीन दिवसातील नफा ५० हजार रुपये झाला आहे. जिल्हा परिषद ठाणे, मार्फत उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय स्तरावर आम्हाला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी योग्य नियोजन करून दिल्याबद्दल महिला बचत गटातर्फे आभार मानते. – सुजाता जाधव, श्रावणी महिला स्वयं साहाय्यता गट, ता. अंबरनाथ सदर प्रदर्शनामध्ये मिनी सरस ५० स्टॉल, जिल्हा सरस २५ स्टॉल होते. खाद्य पदार्थ, मसाले, हळद, इंद्रायणी तांदूळ, ग्रामीण कलाकसुरीच्या विविध वस्तू, नागलीच्या कुकीज, नागली प्रिमिक्स, कडधान्य, डाळी, शाकाहारी, मांसाहारी मेजवानी व इतर विविध वस्तु विक्रीसाठी व प्रदर्शनासाठी उपलब्ध होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *