ठाणे: संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे, आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा साथरोग अधिकारी डॉ. महेश जाधव, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीम. योगिता पाठक(धिवर), कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीम. उर्मिला यशवंत तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
