ठाणे:संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे, कृषी विभाग अंतर्गत जिल्हा कृषी अधिकारी श्रीम. सारिका शेलार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पशुसंवर्धन विभाग व कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संत सेवालाल महाराज समाजसुधारक व धर्मसुधारक म्हणुन ओळखले जातात. त्यांनी समाजातील अनेक ज्वलंत विषयावर शिकवण दिली आहे. त्यांनी दिलेल्या विचारांना आत्मसात करणे आज खरोखर गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण, भेदभाव न करणे, स्त्रियांचा सन्मान करणे, अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नये अशा अनेक चांगल्या विचारांचे बिज त्यांनी पेरले आहे. संत सेवालाल महाराज यांना विनम्र अभिवादन करतो असे प्रतिपादन यावेळी विस्तार अधिकारी जिल्हा परिषद ठाणे श्री. बी.डी. जावीर यांनी केले.