जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण भागात रोजगाराची संधी

ठाणे

बेरोजगार युवक/युवतींनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन
   
ठाणे : मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभागीयस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्यामध्ये दि. 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये “नमो महारोजगार” कोकण विभागीयस्तरीय मेळाव्याचे आयोजन हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे करण्यात येणार आहे.

या माध्यमातून 1 लाख 50 हजार युवक/युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामीण भागात “नमो महारोजगार” मेळाव्याचे प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत असून आपल्या जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलद्वारे मेळाव्यास नोंदणी करण्याचे आवाहन मा. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे तसेच उमेदवार नोंदणी व रिक्त पदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *