सर्व ग्रामस्थानी आपल गाव स्वच्छ व सुंदर व्हावं यासाठी पुढाकार घ्यावा – कपिल पाटील
ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये एकाच वेळी `स्वच्छतेचा जागर’ करण्यात आला. दिवे अंजूर, भिवंडी येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि जिल्हा परिषद, ठाणे च्या वतीने स्वच्छता मोहिम हा उपक्रम आज राबविण्यात आला. पुढील तीन महिन्यात जास्त काम करून गाव स्वच्छ करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. दिवे अंजूर, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम व स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले. दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले, सावित्रीबाई ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले. ग्रामस्थानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावे यासाठी जिल्हा परिषद ठाणे मार्फत पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक स्वच्छतेची शपथ सर्व ग्रामस्थानी घेतली.
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यात गावांच्या स्वच्छतेचा पायलट प्रकल्प म्हणून हा कार्यक्रम राबविला जात असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान राबविले त्याचा विस्तार झाला. शौचालय, सार्वजनिक शौचालय, समाज जागृती द्वारे काम करण्यात आले. तसेच शहरी भागाचा विकास होत असताना ग्रामीण भागाचा विकास होणे देखिल महत्त्वाचे आहे त्यामुळे गाव, रस्ता, शाळा, घर आणि आपल गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण सर्वानी पुढाकार घ्यावा असे आवाहन कपिल पाटिल यांनी केले.
यावेळी मा. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले की गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गाव स्वच्छ करण्यासाठी जबाबदारी घ्यावी असे गावकऱ्यांना वचन देण्यास सांगितले. मा. कपिल पाटिल यांच्या मार्गदर्शनाने स्वच्छता मोहिम ठाणे ग्रामीण मध्ये राबविण्यात येत आहे. याबाबत विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डीप क्लीन ड्राईव्ह उपक्रम राबविला आहे. पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी या कामास पुढे घेऊन जाण्यास संदेश दिला आहे. स्वच्छतेची चळवळ गावागावात राबविण्यात यावे व आपले गाव आदर्श गाव हाईल यासाठी प्रयत्न करावे.
दिवे अंजूर गावात कचऱ्यावर रिसायकल करणारे प्लांट तयार करणार असल्याची माहिती मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी दिली. तसेच गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ग्रामस्थानी पुढाकार घेऊन स्वच्छतेची चळवळ जल्लोषात यशस्वी करावे असे सांगितले.
या स्वच्छतेच्या कार्यक्रमात मा.ना. कपिल पाटील, जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री. प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग पंडित राठोड, भिवंडी गट विकास अधिकारी श्री प्रदिप घोरपडे तसेच गावचे सरपंच व सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी, महिला, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.