ठाणे: स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गाव हागणदारीमुक्त अधिक (model) म्हणून घोषित करून सदर गावांमध्ये कायमस्वरूपी सातत्य राखणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ही कचरामुक्त होवून स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त होणे अत्यंत गरजेच आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबवून गावे कचरामुक्त, स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्वनियोजनासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद करण्यात आले.
स्वच्छता मोहिम दि. ०३/०१/२०२४ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राबविणेबाबत निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्यात येणार असून पुढील सर्व नियोजन काटेकोरपणे करण्यात यावेत अशी सुचना यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे तसेच सर्व जिल्हास्तरावरील विभाग प्रमुख, सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालूकास्तरावरील विभाग प्रमुख, उपअभियंता ग्रा.पा.पू., सर्व सर्व विभागातील विस्तार अधिकारी, गट समन्वयक व समूह समन्वयक उपस्थित होते.