ठाणे जिल्ह्यातील RTE २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयात १०९९६ बालकांची निवड

ठाणे

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये शाळांनी निश्चित केलेल्या प्रवेशस्तर वर्गात बालकांसाठी २५% प्रवेश राखीव ठेवण्यात आलेले आहेत. सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत असून प्रथम फेरीमध्ये १०९९६ निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश प्रक्रीयेची सुरुवात दिनांक १३/०४/२०२३ पासून सुरु झाली असून पालकांना SMS द्वारे अवगत होणार आहे. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वर बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता RTE २५% ऑन लाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण ६२८ पात्र शाळा असून एकूण १२२६३ रिक्त जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश निश्चितीसाठी ॲलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केंद्रामध्ये पडताळणी समितीकडून शासनाने निश्चित केलेल्या दिनांक १३/०४/२०२३ ते दिनांक २५/०४/२०२३ या कालावधीमध्ये (कार्यालयीन व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत विहीत मुदतीत करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या RTE PORTAL वर त्यांच्या लॉगीनमध्ये ॲलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी. सदर ॲलोटमेंट लेटर व प्रवेश प्रक्रीयेकरिता आवश्यक कागदपत्रे मुळ प्रतींसह छायांकित प्रतींचा दोन संच घेऊन पडताळणी केंद्रावर उपस्थित राहून पडताळणी समितीकडून दिनांक १३/०४/२०२३ ते दिनांक २५/०४/२०२३ या कालावधीमध्ये ( कार्यालयीन व शासकीय सुटीचे दिवस वगळून) विहीत मुदतीत कागदपत्रांची तपासणी करुन आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *