समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,ठाणे मार्फत ५% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन २०२३-२४ या वर्षामध्ये राबविण्यास घेण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तिनी अथवा दिव्यांगांच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरीता मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना करण्यात आले असून दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये बनवलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
विक्री मेळावा दि. २२ डिसेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३ या दरम्यान सकाळी ९.०० ते सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत ठाणे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले जिल्हा परिषद, प्रांगण, ठाणे स्टेशन, ठाणे (प) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या वस्तू विक्री व प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी व दिव्यांग विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी केले आहे.
स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या वस्तू
तोरण, रुमाल पेंटिंग, कार्ड फुले, ग्रीटिंग कार्ड, कृत्रिम गजरे, ज्वेलरी, कागदी फुले, कापडी पिशवी इत्यादी वस्तूचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. संजय बागुल यांनी दिली.