ठाणे: “माझी वसुंधरा, अभियान” ४.० अंतर्गत पंचतत्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद ठाणे मधील ४३१ ग्रामपंचायतीमध्ये फटाके वापर कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. यामुळे वायु प्रदुषण व ध्वनी प्रदुषण प्रतिबंध होण्यास मदत होईल. तसेच पर्यावरण व जनहितार्थ संरक्षण करण्यासाठी उत्तम कार्य ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत आहे.
वायु प्रदुषण लक्षात घेता माझी वसुंधरा अभियान ४.० राबविण्यात येत असून सर्व ग्रामपंचायतींना फटाके वापर कमी करण्यासाठी पर्यावरण पुरक दिवाळी साजरा करण्यासाठी ग्रामस्थांना मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री.प्रमोद काळे यांनी आवाहन केले आहे.
वायु, जल, आकाश, पृथ्वी, अग्नी या पंचतत्वानुसार पर्यावरणास हानी होणार नाही व पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी विविध उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, सोलार पंप, वृक्षलागवड, बायोगॅस प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, सिंगल युज प्लास्टिक बंदी असे उपक्रम राबविण्यात येत आहे तसेच पर्यावरण दूत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत.
