दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी “माझी लेक योजना”

ठाणे


ठाणे :समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी “माझी लेक” योजना राबविण्यात येत आहे. सन २०२३-२०२४ मधील ५ टक्के दिव्यांग कल्याण सेस फंडातील योजना दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी “माझी लेक” योजनेंतर्गत ५० हजार रु. मुदत ठेव रक्कम ठेवण्यात येईल. योजनेचा कालावधी दि. १/०४/२०२३ ते ३१/०३/२०२४ या आर्थिक वर्षाकरिता करण्यात आला आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पिय तरतूद २५ लक्ष रुपये करण्यात आली आहे.

दिव्यांग पालकांच्या मुलींच्या भविष्यासाठी माझी लेक योजना राबविण्यात येत आहे. दि. १ जानेवारी २०२० रोजी किंवा त्यानंतर जन्मास आलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी अर्ज ग्रामपंचायत/ पंचायत समिती यांच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागाकडे सादर करण्याचे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.


योजनेचा उद्देश
दिव्यांग पालकांच्या एक किंवा दोन मुलींच्या भविष्यासाठी व शिक्षण घेण्यासाठी सहाय्य होणे व पुढील जीवन सुखकर होणेसाठी मुदतठेव योजनेत पालक व मुलगी यांच्या संयुक्त नावे गुंतवणूक करणे.

योजनेच्या अटी व शर्ती
1) पालकांचे दिव्यांगत्व ४०% च्या वर असावे व तसा दिव्यांग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
2) लाभार्थी कुटुंबाचे दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असल्यास दारिद्रय रेषेचा दाखला अथवा रु. १,००,०००/- च्या आत उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला दाखला जोडण्यात यावा.
3) अर्जासोबत आधारकार्ड व रेशनकार्ड छायांकित प्रत जोडणे आवश्यक.
4) दि. १ जानेवारी २०२० रोजी किंवा त्यानंतर जन्मास आलेल्या मुलींना लाभ देता येईल.
5) लाभार्थी अर्ज ग्रामपंचायत/ पंचायत समिती यांच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागाकडे सादर करावे.
6) लाभार्थी अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ठराव समितीस राहील.
7) कुटुंबात अपत्य संख्या दोन असावी व तसा सरपंच/ प्रशासक व ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांचा दाखला जोडण्यात यावा.
8) एका मुलीसाठी ५० हजार रुपये व दोन मुली असल्यास प्रत्येकी २५ हजार रुपये प्रमाणे रक्कमेचे मुदत ठेव काढण्यात येईल.
9) मुलींचे वय १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर मुदत ठेवीची रक्कम काढण्यात यावी.

योजनेची कार्यपध्दती
1) प्रस्ताव समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,ठाणे यांच्याकडे ग्रामपंचायत व पंचायत समिती शिफारशीसह प्राप्त होणे आवश्यक.
2) प्रस्तावाची छाननी करून परिपुर्ण प्रस्ताव समाज कल्याण समिती/ ठराव समिती यांचे मंजूरीसाठी ठेवणेत येतील व मंजूर झालेल्या लाभार्थीस या योजनेचा लाभ देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *