( प्रेस रिलिज )
ठाणे जिल्ह्यातील मेरी मिट्टी मेरा देश अभियान टप्पा -२ अंतर्गत अमृत कलश यात्रा सर्व ग्रामपंचायतीमध्ये १ सप्टेंबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान कलश यात्रा आयोजित करण्यात आली. त्या अनुषंगाने ढोल, ताशे इ. साहाय्याने गावागावत फेरी काढून प्रत्येक घराघरातुन मूठभर माती किंवा थोडे तांदूळ कलश मध्ये घेऊन उत्साहाने कार्यक्रम राबविण्यात आले. सन्मा. लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत सादर कार्यक्रम संपन्न झाले आहेत.

मेरी मिट्टी मेरा देश अभियान तालुकास्तरावर उत्तमरित्या राबविण्यात आले. प्रत्येक गावातुन मूठभर माती व थोडे तांदुळ गोळा करून अमृत कलश तयार करण्यात आले असुन पुढिल नियोजनासाठी २४ स्वयंसेवक, १ जिल्हा समन्वयक अमृत कलश घेऊन दिल्लीला जातील अशी माहिती मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
१ ऑक्टोबर २०२३ ते १३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान सर्व कलश एकत्रित करून तालुकास्तरावर देखील सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. याबाबत नेहरू युवा केंद्राच्या साहाय्याने सांस्कृतिक शो, रोड प्ले इ. बाबत कार्यक्रम संपन्न झाले आहेत. तालुकास्तरावर उत्तम कार्यक्रम राबविल्यामुळे सर्वांचे कौतुक मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी केले.
अमृत कलश यात्रेचे पुढील नियोजन
ठाणे जिल्हास्तरीय २५ लोकांचा समावेश यामध्ये करण्यात आला असून जिल्हा समन्वयक म्हणून सचिव, उल्हासनगर महानगरपालिका श्रीम. प्राजक्ता कुलकर्णी व महानगर पालिका, नगर परिषद, पंचायत समिती येथिल एकूण २४ स्वयंसेवक आहेत. पंचायत समिती अंतर्गत अमृत कलश यात्रा दिल्लीला पाठविण्यासाठी स्वयंसेवक निवड ५ तालुक्यातून प्रति तालुका २ याप्रमाणे १० स्वयंसेवक निवड करण्यात आली असून याबाबत नेहरू युवा केंद्राची मदत घेण्यात आली आहे. त्यांचे पोशाख देखील लोगो सहित तयार झाले आहेत. तसेच या स्वयंसेवक यांच्यासाठी वाहन व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथे ऑगस्ट क्रांती मैदान येथे मा.मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते, खासदार व आमदार यांचे उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी स्वयंसेवक विशेष रेल्वेने दिल्लीला प्रयाण करणार आहेत. मुंबई ते दिल्ली व्यवस्था राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबर,२०२३ रोजी मा.प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम कर्तव्य पथ दिल्ली येथे संपन्न होणार आहे.