यशवंतराव चव्हाण सभागृहात आपत्ती धोके निवारण दिन साजरा

ठाणे


आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे येथिल यशवंतराव चव्हाण सभागृहात आपत्ती धोके निवारण संदर्भातील प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या उपस्थितीत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारत मासाळ यांनी व उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले. तसेच सर्वेक्षण कार्यक्रम अधिकारी, ठाणे डॉ. सरू गुप्ता व सनियंत्रण व मुल्यमापन सांख्यिकी संदिप पाटील यांनी आपत्ती धोक्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांबाबत व प्रतिबंधात्मक कार्यवाही बाबत सामुदायीक आरोग्य अधिकारी यांचे उजळणी प्रशिक्षिण घेतले.

आपत्ती धोके कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने दि.१३ ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार राज्यातही दि.१३ ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

त्यानुषंगाने आपत्ती प्रवण भागात जीवित, वित्त व पर्यावरणविषयक हानी होऊ नये, म्हणून कटिबद्ध राहण्यासाठी “प्रतिज्ञा करतो/करते की, शासनाच्या आपत्ती सौम्यीकरण्याच्या विविध उपक्रमात मी सक्रिय सहभाग नोंदवून, आपत्तीपासून माझी, माझ्या परिवाराची, माझ्या समाजाची व सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याविषयी ज्ञान प्राप्त करीन, आपत्तीचे धोके कमी करणाऱ्या समुदाय आधारित उपक्रमामध्ये मी सक्रिय सहभाग घेईन, माझ्या परिवारात व समाजात आपत्तीबद्दल जनजागृती करून त्यासंबंधी पूर्वतयारी कशी करावी, याविषयी सदैव प्रयत्न करीन, राज्यातील आपत्तीप्रवण भागात, जीवित वित्त व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून, मी सदैव कटिबध्द राहीन”, अशी प्रतिज्ञा यशंवतराव चव्हान सभागृहात आज घेण्यात आली.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *