जिल्हा परिषद केंद्रशाळा कान्होर येथे साकारली बोलणारी परसबाग

ठाणे


जि.प. केंद्रशाळा, कान्होर येथे एकुण 81 मुले शिक्षण घेत असून, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी ज्योती वाळकु राऊत, मदतनीस तारा भोपी यांच्या सहकार्याने सेंद्रिय परसबाग शाळेच्या आवारात तयार केली आहे. शिक्षक श्री. अमोल पेन्सलवार यांनी पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देऊन परसबागेतील प्रत्येक झाडाला QR कोड दिला आहे. तो. QR कोड स्कॅन केल्यानंतर प्रत्येक झाड स्वतः बोलू लागते, म्हणजेच ते झाड स्वतःचे नाव, उपयोग, गुणधर्म, पोषणमूल्य इत्यादी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देते. या परसबागेत अळूची पाने, काकडी, भोपळा, दोडकी, कारली, डोंगर, चवळी, कडीपत्ता, तोंडली ,औषधी वनस्पती, अडुळसा, तुळस, कोरफड, पानफुटी यांचेही झाडे लावली आहेत.



ही सर्व परसबाग शाळेच्या आवारातच तयार होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक वाढते. विद्यार्थी निसर्ग व पर्यावरणाशी एकरूप होतात तसेच परसबागेतील तयार होणार्‍या शाळेतील भाज्या यांचा मुलांच्या दैनंदिन पोषण आहारात समावेश केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुपोषण दूर होऊन विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळण्यासाठी मदत होत आहे.

शाळेतील शिक्षक श्री. अमोल राजेंद्र पेन्सलवार यांच्या संकल्पनेतून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कमल राजेंद्र फसले यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. केंद्रशाळा कान्होर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे शाळेत येथे बोलणारी परसबाग तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सर्व परसबाग कुठल्याही रासायनिक औषधांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने तयार केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचे ही महत्त्व कळते.

या उपक्रमाचे जिल्हा परिषद ठाणे चे शिक्षणाधिकारी श्री.भाऊसाहेब कारेकर, उपशिक्षणाधिकारी श्री. ज्ञानदेव निपुर्ते, अंबरनाथ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार जतकर, शालेय पोषण आहार अंबरनाथ तालुका अधिक्षिका श्रीम.नीलम पाटील, बीट विस्तार अधिकारी श्रीम. रुचिता भंडारे, केंद्रप्रमुख श्री. योगेश डेंगाने यांनी कौतुक केले. तसेच कान्होर गावचे सरपंच सौ .दर्शना प्रकाश देशमुख, उपसरपंच श्री. हरेश गणपत राऊत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री .जगदीश गणपत राऊत, उपाध्यक्षा सौ.अपेक्षा प्रविण झुंजारराव तसेच सर्व सदस्य व पालक यांनी कौतुक केले.


*शिक्षक प्रतिक्रिया*
परसबागेतील प्रत्येक झाडाला QR दिला असल्यामुळे झाडे स्वतःची माहिती स्वतः देतात. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड दिल्यास शिक्षण प्रभावशाली बनते व विद्यार्थी आवडीने सहभागी होतात.
श्री. अमोल राजेंद्र पेन्सलवार
प्राथमिक शिक्षक
(राज्य पुरस्कार सन 2021-22 )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *