१ तारीख १ तास महाश्रमदान: स्वच्छता ही सेवा २०२३ उपक्रम

ठाणे



कचरा मुक्त गाव करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल


दरवर्षी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. सदर दिवशी संपूर्ण देशभरात स्वच्छता जनआंदोलन साजरे केले जाते. यावर्षी देखील स्वच्छ भारत २०२३ च्या निमित्ताने दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत *स्वच्छता ही सेवा* अभियान राबविणे बाबत केंद्र आणि राज्यस्तरावरून कळविण्यात आले आहे आणि यामध्ये स्वच्छता ही सेवा २०२३ ची थीम कचरा मुक्त भारत आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच श्रमदान करणे गरजेचे आहे आणि ग्रामीण भागातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, पर्यटनस्थळे, नदीकिनारे, घाट, नाले, मंदिर, वारसास्थळे, ऐतिहासिक वास्तू, महामार्गलगतची कचरा ठिकाणे या ठिकाणी मोहीम राबविण्यात येत आहे.



स्वच्छता ही सेवा 2023 उपक्रमा अंतर्गत २ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १ ऑक्टोबर २०२३ या रोजी *एक तारीख एक तास महाश्रमदान* ठिक सकाळी १०.०० वा किमान एक तासासाठी महाश्रमदान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम सर्व गावांमध्ये, सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालये, बसस्थानक, मंदिर, ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटनस्थळ, नदीकिनारे लगत आणि साठवण तलाव, कचरा असलेली ठिकाणे, शाळा अंगणवाडी परिसर, महामार्ग लगतची कचरा ठिकाणे अशा ठिकाणी जागेची निवड करून प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधीना निमंत्रित करून घेणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. घेण्यात आलेल्या उपक्रमाचे फोटो केंद्र शासनाच्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या पोर्टलवर वर अपलोड करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये १ ऑक्टोबर २०२३ रोजी महाश्रमदान कार्यक्रम यशस्वी करणेसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावरील सर्व खाते प्रमुख यांची बैठक घेऊन यांना सुचना देण्यात आल्या आहेत आणि प्रत्येक तालुक्यास आणि प्रत्येक ग्रामपंचायतीस एक नोडल अधिकारी नेमणूक करण्यात आले आहे तसेच जास्ती जास्त लोकांचा सहभाग मिळवणेसाठी जानजागृती करण्यात आली आहे.

गाव कचरा मुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महाश्रमदान उपक्रमामध्ये सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे व कचरा मुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी केले आहे.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. रुपाली सातपुते यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे आढावा घेतला असून लोकप्रतिनिधी, सर्व शासकिय अधिकारी /कर्मचारी, शाळेतील मुले, महिला बचतगट, युवक मंडळे, स्थानिक सेवा भावी संस्था यांचा सहभाग घेण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत.

महाश्रमदानासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय एकुण ९५७ इव्हेंट क्रिएशन करून घेण्यात आले आहेत आणि महाश्रमदान करण्यात येणाऱ्या जागेची निवड देखील करण्यात आली असून त्याची नोंद पोर्टल देखील करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य झाडू, खराटे टोपली, हातगाडी, घंटागाडी तयार ठेण्यात आली आहेत.

यावेळी सर्वाचे प्रधान्य केवळ सफाई हे असणार आहे आणि यावेळी कुठल्याही प्रकारचे स्वागत बुके हार यांना फाटा देण्यात येणार असून पाण्याच्या बाटल्याचा देखील वापर करण्यात येणार नाही आणि सफाई नंतर जमा झालेला कचरा वाहनाने संबंधित स्थळी पाठविण्यात बाबत नियोजन करण्यात आले आहे आणि या महाश्रमदान करण्यात आलेल्या जागेचे आधीचे आणि नंतरचे छायाचित्रण करण्यात येणार असून यातील निवडक फोटो गावनिहाय केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी ४.०० पर्यंत अपलोड करण्यात येऊन कार्यक्रम पुर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतरच सदर उपक्रमाची नोंद केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर दिसणार आहे अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक श्री दादाभाऊ गुंजाळ यांनी दिली.


स्वच्छता ही सेवा 2023 मोहिम

मोहीम कालावधीत ग्रामीण भागात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २३ या कालावधीत विविध उपक्रम घेणेबाबत देखील सुचना करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील लोकांमध्ये जास्तीत जास्त जानजागृती होण्यासाठी शाळेतील मुलाच्या स्वच्छता या विषयावर विविध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि त्याच बरोबर स्वच्छता रन, कुटुंबस्तरावर गृहभेट आणि सफाई मित्र सुरक्षा दिवस साजरा करण्यात आले आहे. स्वच्छतेचे काम करणारे सफाई कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांच्या आरोग्याची तपासणी देखील करण्यात आली आहे.

या सर्व उपक्रमामध्ये सर्व विभागाचे स्थानिक अधिकारी, पदाधिकारी,शाळेतील मुले ,बचत गटातील महिला, गावातील नागरिक, युवक मंडळे, सफाई कर्मचारी आणि पत्रकार यांचा देखील सहभाग घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *