शुक्रवार दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व, महामानव, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी होत आहे.
समता, बंधुता, एकता अशी अनेक मुल्य जगभरात रुजविण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंतीनिमित्त जिल्हा परिषद येथिल यशवतंराव सभागृहात अभिवादन करण्यात आले. समाज कल्याण विभाग प्रमुख श्री. संजय बागुल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. बाबासाहेबाचे बालपण, शिक्षण, कार्य व सामाजिक भान या सगळ्या विषयावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. प्रमोद काळे यांनी बाबासाहेब यांच्या बद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की बाबासाहेबाचे विचार आत्मसात करने गरजेचे आहे. बाबासाहेब एका विशिष्ट जाती वर्गाचे अस न मानता त्यांनी जे कार्य केलंय ते जगासमोर आदर्श आहे हे पाहणे देखिल महत्त्वाचं आहे.
सर्वाना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंतीनिमित्त खुप शुभेच्छा.दिल्या
बाबासाहेब बद्दल बोललो तर रात्रदिवस जातील एवढ समृध्द कार्य त्यांनी केलं आहे. अस एक ही क्षेत्र नाही ज्यावर बाबासाहेबांनी कार्य केलं नाही. त्याचे विचार कृतीत उतरवणं म्हणजे बाबासाहेबांना केलेलं अभिवादन असेल असे प्रतिपादन श्री. संजय बागुल यांनी केले अशी माहिती
जनसंपर्क अधिकारी
जिल्हा परिषद ठाणे यांनी दिली
…………………………………….
