मेरी मिट्टी मेरा देश: ४३१ ग्रामपंचायतीमध्ये राबवणार पाच उपक्रम

ठाणे


आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत गावागावात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पाच उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) श्री. प्रमोद काळे यांनी दिली आहे.

प्रत्येक गावामध्ये आपल्या मातृभूमी विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान घेण्याचे उद्देश आहे. या अभियानात ४३१ ग्रामपंचायती, ५ पंचायत समित्या व जिल्हा परिषद मार्फत योगदान देणे अभिप्रेत आहे.

९ ऑगस्ट २०२३ पासून ते १४ ऑगस्ट पर्यंत एका दिवशी पाच उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिलाफलक (अमृत सरोवर/ शाळा/ ग्रामपंचायत) गावातील स्मरणीय एका ठिकाणी उभारणी करण्यात येणार आहे. शिलाफलकांवर लिहिण्यासाठी पंचायत क्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे निश्चित करून शिलाफलक उभारण्यात येणार आहे.

वसुधा वंदन यामध्ये गावातील योग्य ठिकाण निवडून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका करण्यात येणार आहे. वीरांना वंदन याकरिता ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या, निवृत्ती वीरांचा, स्वातंत्रसैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी सन्मान करण्यात येईल. पंच प्रण (शपथ) द्वारे सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, गावकरी पंचप्राण शपथ घेण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे १५ ऑगस्टला गाव क्षेत्रात ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *