ठाणे:शोषित, वंचित, कष्टकरी वर्गाला त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. त्यांनी आपल्या साहित्यातून परिवर्तनाचा विचार मांडला.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे समाज कल्याण विभाग अंतर्गत त्यांच्या प्रतिमेस अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी समाज कल्याण विभाग प्रमुख श्री. संजय बागुल, विभागातील इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
