छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार केला तसाच विचार लोकांच्या कल्याणासाठी करा- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साडेतीनशे वर्षांपूर्वी ६ जून रोजी झाला हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखीन दृढ करण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालय मध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून शासन निर्देशानुसार साजरा करण्यात येतो. शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे येथील आवारात कार्यक्रम सकाळी ९ वाजता संपन्न झाला. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री. मनुज जिंदल यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी शासन निर्देशानुसार मानाची स्वराज्यगुढी उभारून वंदन करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत गात उत्साही वातावरण निर्माण झाले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दादाभाऊ गुंजाळ यांनी छत्रपती महाराजांचे कार्य किती विशाल आहे याबद्दल माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत वातावरण प्रसन्न होऊन महाराज्यांच्या आठवणींना व इतिहासाला उजाळा दिला गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत आपण सर्वांनी जोमाने कामाला सुरुवात करूया. आपल्या प्रगतीच हे पाऊल असंच पुढं टाकूया. प्रामाणिक, मेहनतीने, येणाऱ्या प्रत्येक अडचणी आणि संकटावर मात करत काम करण्याची प्रेरणा आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून सातत्याने घ्यायला हवी. मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो व सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या सदिच्छा देतो असे प्रतिपादन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.
अति मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) श्री. अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व) श्री. दादाभाऊ गुंजाळ, इतर सर्व विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते.
कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी गीत व पोवाडा श्री. जयवंत भंडारी यांनी सादर केले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल सुर्यवंशी यांनी केले.