ठाणे:(प्रेस नोट) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन’ या संकल्पनेला पुर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तालुका पातळीवर कोपरा बैठक, चर्चा सत्र, प्रभात फेरी, पोस्टरद्वारे व्यापक लोकसहभागाने जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी जनजागृती करणे महत्वाचे आहेच यासाठी जिल्हा परिषद ठाणे मार्फत तालुका पातळीवर कार्यक्रम व्यवस्थापनेसाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री. मनुज जिंदल यांनी मार्गदर्शन केले.
राज्य शासनाने एकल प्लास्टिक उत्पादन, साठवणूक, विक्री व वापर करण्यावर बंदी घातलेली आहे. तसेच भारताचे पंतप्रधान यांनी लाईफ फॉर एनव्हआर्मएंट ही संकल्पना मांडली असून पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी मिशन लाईफ चळवळ सुरू आहे. या मिशन लाईफ चळवळीचे तत्वं लक्षात घेता एकल प्लास्टिक वापरास (single use) संपुर्णपणे नकार देणे हे अनुशासन प्रत्येकाने स्वीकारणे आवश्यक असल्याचे आवाहन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांना करण्यात येत आहे.
प्लास्टिक समस्या व विलिनीकरण तसेच गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा या समस्येला लक्षात घेऊन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने गाव पातळीवर ग्रामपंचायती द्वारे प्लास्टिक गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे तसेच काल्हेर ग्रामपंचायत, भिवंडी येथे प्लास्टिक गोळा करण्यासाठी समूह तयार करण्यात आले आहे. ग्रामस्थांना एकत्र करुन चर्चा सत्र, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पत्रक वाटतं करुन १०० कुटुंबांना कचरा विलिनीकरण करण्यासाठी सेल्फ केअर फाउंडेशन या संस्थेने पुढाकार घेतला आहे. अंबरनाथ व कल्याण येथे सेस फंडातून दिड कोटी रुपये निधी कचरा व्यवस्थापनासाठी खर्च करण्यात येणार आहे. प्लास्टिक नियोजन करण्यासाठी १५ वित्त आयोगाच्या माध्यमातून शहापूर तालुक्यात काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गाव पातळीवर कचरा व्यवस्थापन करणे मोठी समस्या असून जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीवरील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी निबंध स्पर्धा, पत्रक वाटत, कोपरा बैठक, चर्चा सत्र, प्रभात फेरी, व्याख्यानमाला, पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा अशा प्रकारे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
