ग्रामीण भागात आपात्कालीन पूरपरिस्थितीमुळे साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. नियंत्रण कक्ष व पूरपरिस्थिती नैसर्गिक आपत्तीमुळे आरोग्य विभागातंर्गत ३ पथके वाहन व्यवस्थेसह २४ तास कार्यान्वित करण्यात आले आहे तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यात ३ तज्ञ डॉक्टरांचे पथक वाहन व्यवस्थेसह शिघ्र प्रतिसाद पथक ही नेमण्यात आले आहे.
प्रत्येक तालुकास्तरावर फ्लाईग स्कॉड तयार करण्यात आले आहे या व्यतिरिक्त तालुकास्तरावर/ प्रा. आ. केंद्रावर वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारीसह २४ तास कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. आरोग्य संस्थेस आवश्यक तो औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्पदंशवरील इंजेक्शन सुद्धा उपलब्ध आहेत.
पिण्याच्या पाण्याचे साठे नियमित ब्लिचिंग पावडरद्वारे शुध्दीकरण करण्यात येत आहेत. त्याच्या पडताळणी करिता ओ.टी.टेस्ट नियमितपणे करण्यात येत आहे.
अतिसार/ विषमज्वर व काविळ, डेंग्यु, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस या साथ रोगाच्या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती आरोग्य विभाग प्रमुख डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
३३ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, वाहनचालक, शिपाई व सफाई कामगार उपस्थित आहेत. सदर टिम करिता औषध पुरवठा, स्ट्रेचर, सुस्थितीत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.