जिल्हा परिषद, ठाणे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा. डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभा सदस्य, कल्याण यांच्या विशेष प्रयत्नातून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शनिवार, दिनांक ६ मे २०२३ रोजी सायंकाळी ०५:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, नेवाळीजवळील मैदान, तालुका अंबरनाथ येथे डिजीटल भूमिपूजन मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाव – पाड्यांकरीता जिल्हा परिषद ठाणे मार्फत सन २०१९-२०२४ या वर्षाचा एकूण रु.७२६.१३ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असुन या कामांचे कार्यादेश कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील संरपच यांना मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते देण्यात आले. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७८७ गावांकरीता योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये ४९० रेट्रोफिटींग व २९७ नवीन योजनांचा समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत दीड लाख कुटूंबाना घरगुती नळजोडणी देण्यात आलेली आहे. तसेच व्हिडीयोच्या माध्यमातून अंबरनाथ तालुक्यातील काकोळे गावातील यशोगाथा सर्व ग्रामस्थाना दाखविण्यात आले.
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विशेष प्रयत्नातुन आपल्या तालुक्यातच नाही तर आपल्या घरापर्यंत पाणी या योजनेद्वारे देण्याचे प्रयत्न करत आहोत. या भागात आधी केव्हाच येवढ्या जास्त निधीची योजना आली नव्हती पण आता प्रत्येक कुंटुबाला घरापर्यंत नळ जोडणी देण्याचे काम आपण करत आहोत. तसेच कचरा व्यवस्थान करण्यासाठी सुध्दा विशेष प्रयत्न करू यासाठी गावातील संरपच यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे कार्यक्रमांत प्रतिपादन केले.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील यांनी व्हिडीयो कॉन्फर्सद्वारे ग्रामस्थाना शुभेच्छा दिल्या व उद्घाटन लवकर होईल व तेव्हा मी उपस्थित असेल असे आश्वासन दिले.
स्वच्छ भारत मिशन मोहिमेतील अत्यंत महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जानेवारी २०२३ अखेर वैयक्तिक शौचालय २,०३,६१३ व सार्वजनिक शौचालय १८७ एवढे बांधण्यात आले आहेत. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, मैलगाळ व्यवस्थापन या घटकांवर देखिल कार्य सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत ७९२ गावांचे स्वच्छता विषयक बाबीवर स्वयंमुल्यांकन करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे ग्रामीण भागातील विविध समस्यांवर कार्य सुरू आहे. जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुढील एक वर्षात पाण्याचा प्रश्न सुटणार तसेच गावातील इतर बाबी लक्षात घेऊन महत्त्वाच्या कामांची अमंलबजावणी केली जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी सांगितले.
यावेळी मा. डॉ. श्रीकांत शिंदे, लोकसभा सदस्य, मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे विधानपरिषद सदस्य, मा. श्री. गणपत गायकवाड विधानसभा सदस्य, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल, प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख दादाभाऊ गुंजाळ, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग अर्जून गोळे तसेच अधिकारी, कर्मचारी, संरपच व ग्रामस्थ या कार्यक्रमात उपस्थिती होते.