जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यशाळा व भूमिपूजन सोहळा आयोजन

ठाणे


जिल्हा परिषद, ठाणे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा. डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभा सदस्य, कल्याण यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यशाळा व भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आले आहे. कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शनिवार, दिनांक ६ मे २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजता कार्यक्रम संपन्न होणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय, नेवाळीजवळील मैदान, तालुका अंबरनाथ येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाव – पाड्यांकरीता जिल्हा परिषद ठाणे मार्फत सन २०१९-२०२४ या वर्षाचा एकूण रु.७२६.१३ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असुन या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. जन जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७८७ गावांकरीता योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये ४९० रेट्रोफिटींग व २९७ नवीन योजनाचा समावेश करण्यात आले आहे. सद्यस्थितीत दीड लाख कुटूंबाना घरगुती नळ जोडणी देण्यात आलेली आहे. या मोहिमेसाठी ग्राम स्थरांवर लोक वर्गणी उभी करणे देखील या मोहिमेला उत्तमरित्या राबवण्यासाठी मदत होऊ शकेल.




स्वच्छ भारत मिशन मोहिम मधील अत्यंत महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जानेवारी २०२३ अखेर वैयक्तिक शौचालय २०३६१३ व सार्वजनिक शौचालय १८७ एवढे बांधण्यात आले आहेत. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, मैलगाळ व्यवस्थापन या घटकांवर देखिल कार्य सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत ७९२ गावांचे स्वच्छता विषयक बाबीवर स्वयंमुल्यांकन करण्यात आले आहे. या मोहिमेव्दारे ग्रामीण भागातील विविध समस्यांवर कार्य सुरू आहे. जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन मोहिमांची माहिती व पुढील कार्यपध्दती या संदर्भातील माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केले आहे.


कार्यशाळा व भूमिपूजन सोहळा मा. श्री. कपिल मोरेश्वर पाटील राज्यमंत्री, पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, मा. श्री, शंभूराज देसाई, मंत्री, राज्य उत्पादक शुल्क, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे व सातारा जिल्हा, मा. श्री. रविंद्र दत्तात्रय चव्हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. कुमार केतकर, राज्यसभा सदस्य, मा. डॉ. श्रीकांत शिंदे, लोकसभा सदस्य, मा. श्री. राजन विचारे, लोकसभा सदस्य यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात विधानसभा सदस्य व विधानपरिषद सदस्यांची उपस्थिती देखिल असणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *