महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या उद्यमशील व उद्योगशील स्मार्ट कल्याणनगरीत
दि.२८ एप्रिल,२०२३ ते दि.१ मे,२०२३ या चार दिवशी दररोज संध्याकाळी ५.०० ते रात्री १०.०० यावेळेत केडीएमसी ग्राऊंड,मुंबई विद्यापीठ उपकेंद्राशेजारी, वसंत व्हँली,कल्याण(प) येथे अत्यंत दिमाखदार व दैदिप्यमान स्वरुपात संपन्न होत आहे.दि.२८ एप्रिल,२०२३ रोजी महोत्सवाचं उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कलामंचवर खान्देशी कलाकारांचं सुरेल व सुरेख गायन,बहारदार नृत्य व दमदार परफॉर्मन्सेसचा जणू कहरच होता.स्टेजवरील चित्ताकर्षक व मनोवेधक डिजीटल स्क्रीन,भव्यदिव्य स्टेज व्यवस्था, मान्यवरांची मार्गदर्शनपर मनोगते,छत्रपतींचा आकर्षक पुतळा,ऐतिहासिक किल्ल्याचं दर्शन घडविणारी स्वागत कमान,जमीनीवरील रेड व ग्रीन कार्पेट,मनोरंजनासाठीचे झुले,पाळणे,कारंजे,संगीमय कार्यक्रमांची जणू रेलचेल होती त्याचप्रमाणे वेज,नॉनवेज खाद्यानाची स्टॉल,गरमागरम जिलेबी,तळलेली व भाजलेली पापड,कंदी पेढे,पुरणपोळी, कळण्याची भाकरी,थालीपीठ, मिसळ पाव,झुणका भाकर,ठेचा,चटणी,मसाल्याचे पदार्थ,अन्नधान्य व कडधान्य यांची शंभराहून अधिक स्टॉल खवैय्यासाठी मेजवानीच होती…विनोद शेलकर,सौ.वर्षा पाटील व कु.वैदेही पाटील यांचं बहारदार,दमदार व कसदार सूत्रसंचालन कार्यक्रमाची उंची वाढविणारं व मंत्रमुग्ध करणारं होतं…!
कल्याण शहरातील प्रतिष्ठित व प्रसिध्द उद्योगपती तथा खान्देश पुत्र मा.श्री.संजय बोरगावकर साहेब,खान्देशभुषण पुरस्कार विजेत्या खान्देशकन्या प्रतिभा ताई,कल्याण भाजपाच्या नेत्या सौ.हेमाताई पवार,सौ.रेखाताई भोईर,प्राचार्या डॉ. किशोरी भगत,मुंबई ज्युनिअर कॉलेज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन भगत सर खान्देशी दिग्दर्शिका मनिषा भामरे नितीन सपकाळ, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण म्हात्रे, प्रकाश भागवत,परीक्षक ललित कला अकादमीच्या संस्थापक सौ.ज्योती अय्यर, झी गौरव पुरस्कार विजेत्या कोरीओग्राफर कु.श्रध्दा नाना अहिरे.यांची उपस्थिती लक्षवेधी होती.

स्वागताध्यक्ष तथा अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मा.श्री. सुनीलभाऊ चौधरी,
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकासपाटील,
कार्याध्यक्ष बापुसाहेब हाटकर,उपाध्यक्ष एल.आर.पाटील,उपाध्यक्ष प्रदिप अहिरे,उपाध्यक्ष एन.एम.भामरे,खजिनदार अप्पासाहेब ए.जी.पाटील, सचिव अॅड.दिपक पाटील,दिगंबर बेंडाळे, सहसचिव किशोर पाटील,सुभाष सरोदे,अमोल बोरसे,मुंबई सेकंडरी स्कूल एम्प्लाईज सोसायटीचे मानद सचिव किशोर पाटील,मुंबई ज्युनिअर कॉलेज एम्लाईज सोसायटीचे सचिव विशाल बावा सर,सहखजिनदार,सल्लागार गणेश भामरे, संजय बिलाले सर,संपर्कप्रमुख प्रकाश पाटील सर,कल्याण विभागप्रमुख प्रभाकर बोरसे सर यांच्या उपस्थितीत संस्मरणीय व ऐतिहासिक उद्घाटन सोहळा संपन्न झाला…!
उद्घाटनप्रसंगी
नंदुरबार जिल्हा प्रमुख मिलिंद बागुल,धुळे जिल्हा प्रमुख शरद शिंदे,जळगांव जिल्हा प्रमुख प्रविण सनेर,कार्यालयीनमंत्री विनायक संन्यासी व सुनील पाटील सर,सदस्य अनिरुद्ध चव्हाण,ज्ञानेश्वर घुगे सर,संदेश पाटील, सतीश पाटील,डी.व्ही.पाटील,भरत पाटील,दिपक राजपूत,सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख विनोद शेलकर, सौ.सुनिता बोरसे,प्रा.प्रकाश माळी,प्रा.अरुण आहिरराव,विनोद शिंदे,प्रा.विजय पाटील,ठाणसिंग पाटील, श्रीमती चेतना भालेराव, सौ.देसले म्याडम व यश महाजन,
महिला आघाडी प्रमुख सौ.भारती वानखेडे,कार्याध्यक्षा सौ.आशा भामरे,उपाध्यक्षा सौ.सुनंदा वाघ,सचिव सौ.वर्षा पाटील,सहसचिव सौ.भावना महाजन,खजिनदार सौ.धनश्री बुवा,सल्लागार सौ.कमल पाटील,सौ.वैशाली पाटील, सौ.कामिनी पाटील, सौ.विद्या अहिरे व सौ.संगिता हाटकर,संपर्कप्रमुख सौ.उज्वला पाटील,प्रसिद्धी प्रमुख सौ.नलिनी पाटील व सौ हर्षला शिनकर,सदस्या सौ.अपर्णा बिलाले,सौ.निता पाटील, सौ.मोनिका पाटील, सौ.अर्चना सरोदे, सौ.मनिषा पाटील, सौ.दिपाली चव्हाण,सजावट समिती प्रमुख यश महाजन,मनोहर भामरे, सुधाकर भामरे, कैलास सरोदे,सुरेश सरोदे, निलेश महाजन व प्रफुल्ल बोरसे या खान्देशी टीमच्या अथक मेहनतीमुळे असीम प्रयत्नामुळे व अजोड कार्यशैली मुळे ग्लोबल खान्देश महोत्सव प्रत्येकाच्या मनांमनांत,घरांघरांत व गावांगावांत पोहोचला…!
ग्लोबल खान्देश महोत्सवानिमित्त कल्याणचे खासदार
डॉ. श्रीकांतजी शिंदे,आमदार अॅड.निरंजनजी डावखरे,कल्याण पश्चिमचे आमदार, विश्वनाथजी भोईर,नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व माजी आमदार नरेंद्रजी पवार,खान्देश मराठा पाटील मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना कल्याण शहरप्रमुख मा.श्री रविंद्रजी पाटील,भाजपा कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे,पालघर जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे,कल्याण पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत भामरे,खान्देशपुत्र प्रशांत माळी इत्यादी राजकीय,सामाजिक व उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी भेट दिली आणि संयोजकांचं कौतुक केलं गौरवोद्गार काढले आणि अभिनंदनही केलं.
कोकणचा हापूस आंब्याचा महारस आणि खान्देशची पुरणपोळी यांचं कॉम्बीनेशन असणारा पुरणपोळी आमरस महोत्सवाचं सूतोवाच श्री.सुनिलभाऊ चौधरी यांनी केलं.मा.खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी खान्देशभवन व खान्देशातील नदीजोड प्रकल्प आणि जळगाव चे रस्ते कांक्रीट साठी ५०० कोटी खानदेश विकास याविषयीचं आपलं मागणं आणि गा-हाणं मी शासन दरबारी व मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे नुसतं पोहचविणार नाहीतर तुमच्यासह पाठपुरावाही करेन असं आश्वस्त केलं.
त्यांनंतर स्वादिष्ट व रुचकर पुरणपोळीरुपी स्नेहभोजनाचा लाभही खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेबानी घेतला.
त्याचप्रमाणे आमदार निरंजन डावखरे साहेबांनी स्टॉलधारकांसोबत संवाद साधला,खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि सोयीसुविधा विषयी विचारपूसही केली आणि स्टेट वरुन ग्लोबल खान्देश महोत्सवाचं गुणगान केलं समाधान आणि आनंद व्यक्त केला.उत्तरोत्तर ग्लोबल खान्देश महोत्सव वेगवेगळ्या उंचीवर पोहोचो असं सूतोवाच केलं… विकास पाटील यांचं खान्देशची दशा,कथा,व्यथा व दिशा दर्शविणा-या गीताचं मेग्यास्क्रीनवर सादरीकरण झालं…!
मराठी पाऊल पडते पुढे चित्रपटाचे निर्माते प्रकाश बावीस्कर यांचा खान्देश उद्योगरत्न पुरस्कार,महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग सचिव मा.सौ.मिनाक्षी पाटील यांचा विशेष खान्देश पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
खान्देशची संस्कृती, रुढी,परंपरा, चालिरिती,भाषा,सण व उत्सव यांचं संवर्धन,संरक्षण व संक्रमण होणं ही काळाची गरज आहे. नोकरी व व्यवसायानिमित्त देशविदेशात,कोकणात, मुंबईत व कल्याण परीसरात स्थलांतरित झालेल्या खान्देशी बंधुभगिनी व नवतरुणपिढीसाठी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ नवनवीन नवोपक्रम राबविण्यात आघाडीवर आहे. ग्लोबल खान्देश महोत्सवाचं हे सातवं वर्ष.पण गेल्या सात वर्षात खान्देश महोत्सव लोकल टू ग्लोबल कधी झाला ते कळलं नाही. ग्लोबल खान्देश महोत्सव म्हणजे खान्देशी खाद्यसंस्कृती कलासंस्कृती,धान्यसंस्कृती, कृषीसंस्कृती व भाषासंस्कृतीचं दर्शन घडविणारा,मनमुराद परमानंद देणारा अद्वितीय व अनोखा आनंद महोत्सवच होय…!
आज दि.१ मे,२०२३ महाराष्ट्र व कामगार दिनी संध्याकाळी ६.०० वाजता रंगारंग व चतुरंगी ग्लोबल खान्देश महोत्सवाचा सांगता समारंभ मान्यवर अतीथींच्या व दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे हेवीवेट सार्वजनिक बांधकाम,अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर व सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.रविंद्रजी चव्हाण साहेब यांनी खान्देश साठी उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ स्थापनेची केलली मागणी आणि नदीजोड प्रकल्पाची आपण केलेली मागणी तर्कसंगत व न्यायसंगत असल्यामुळे शासन दरबारी प्रयत्न करीन. सर्व महाराष्ट्रातील शेतकरी व शेती जलसिंचन प्रकल्पासाठी निश्चितच पुरक व पोषक निर्णय घेवू असं सूतोवाच केलं.ग्लोबल खान्देश महोत्सवाचं सुंदर नियोजन निश्चितच कौतुकास्पद आहे.नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक व नगरसह खान्देश हाच खरा उत्तर महाराष्ट्र आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच माझंही स्वप्न आहे.आपला ग्लोबल खान्देश महोत्सव उत्तरोत्तर अधिक अधिक उंची गाठो.हीच शुभेच्छा.या कार्यक्रम प्रसंगी भाजपा प्रदेश ओबीसी प्रकोष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पाटील सर,आमदार राजूमामा भोळे,कल्याण डोंबिवली मनपाचे नगरसेवक अर्जुन भोईर,नगरसेवक साईनाथ टारे,भाजपाच्या नेत्या सौ.साधनाताई गायकर,माजी नगरसेवक सुनिल वायले,नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक जयवंत भोईर,महाराष्ट्र टाईम्स चे पत्रकार शरद पवार,
हास्यजत्रा फेम सेलिब्रिटी खान्देशपुत्र तथा दिग्दर्शक सचिन गोस्वामी,खान्देशपुत्र तथा अभिनेता श्याम राजपूत, अभिनेत्री तथा निवेदिका प्राजक्ता माळी,अभिनेता हेमंत पाटील,निमिश कुळकर्णी आणि सहयोगी टीमचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला.याप्रसंगी त्यांनी अत्यंत खुमासदार व दिलखेचक स्वरुपात मनोरंजनपर कार्यक्रम ही सादर केला.मा.सचिन गोस्वामी यांना खान्देश भुषण पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.
सांगता समारंभ प्रसंगी पाडळसरे धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा अमळनेरचे माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी,जळगाव जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष हेमंत दादा भांडारकर,पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सदस्य रविदादा पाटील,सात्री ग्रामपंचायत सदस्य तथा अमळनेर तालुका संरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्रभाऊ बोरसे,निंभोरा ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिल पाटील आणि केडीएमसीचे पाणीपुरवठा प्रतिनिधी केणेसाहेब यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
ग्लोबल ग्लोबल खान्देश महोत्सवात ७५ हून स्टॉल होती.चार दिवसांत किमान २५००० हजार हून अधिक रसिक प्रेक्षकांनी महोत्सवाचा आनंद घेतला. महोत्सवात सुमारे २ कोटीहून अधिक रुपयाचा व्यावसायिक टर्न ओव्हर झाला आणि शेतकरी,महिला व तरुणाईला नोकरी ऐवजी व्यवसाय, उद्योग व व्यापाराचं महत्व पटवून देणारा खुलं व्यासपीठ म्हणजे महोत्सव होय.ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित डायरेक्ट फार्मर टू कस्टमर थेट खुली बाजारपेठ म्हणजे ग्लोबल खान्देश महोत्सव होय.सांगता समारंभ अत्यंत शानदार व जानदार होण्यासाठी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,कार्याध्यक्ष,सचिव व महिला आघाडी प्रमुख यांनी गेल्या महिन्याभरापासून कंबर कसली आहे. न भुतो न भविष्यती असा ग्लोबल खान्देश महोत्सव कल्याणनगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ऐतिहासिक कल्याण नगरीचं मानबिंदू बिंदू म्हणजे आगळावेगळा ग्लोबल खान्देश महोत्सव होय…!
उत्तर महाराष्ट्र खान्देश संचालित ग्लोबल खान्देश महोत्सवास भेट देणाऱ्या मा.अतिथींचं,मा.विशेष अतिथींचं,मा.पाहूण्यांचं,मा.
सत्कार मूर्तींचं,इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया प्रतिनीधींचं,मुंबई विद्यापीठाचं,उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष,कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष, खजिनदार,सहखजिनदार,
सचिव,सहसचिव व पदाधिकारी व तमाम कार्यकर्त्यांचं आभार व धन्यवाद…!
मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा व सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.चार दिवशीय महोत्सवाचं सोशीयल मिडिया व फेसबुक, यु ट्युब वर लाईव्ह प्रक्षेपण झाल्यामुळे देशविदेशातील लाखो लोकांनी महोत्सवाचा मनमुराद आनंद घेतला आणि सुंदर प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
चारही दिवस महोत्सवाचं प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील सर यांनी सादर केलं आणि सर्व प्रतिष्ठित व नामांकित मान्यवरांच्या स्वागताची,आदरातिथ्याची आणि सत्काराची जबाबदारी स्वागताध्यक्ष सुनिलभाऊ चौधरी,अध्यक्ष विकास पाटील सर,उपाध्यक्ष प्रदिप अहिरे सर,खजिनदार ए.जी.पाटील साहेब यांनी समर्थपणे व सक्षमतेने एकहाती सांभाळली.दमदार,शानदार व कसदार सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री. विनोद शेलकर,सौ.वर्षा पाटील व कु.वैदेही पाटील लिलया पेलली.आभार प्रदर्शनाची किमया सचिव दिपक पाटील यांनी सक्षमतेने पार पाडली….!
—————————————————