सासूला शिवीगाळ करणाऱ्या जवायाचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली एमआयएडीसी भागातील खंबाळपाड्यात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जवाई शिवीगाळ करत असतानाच त्याचा राग येऊन मेहुण्यानेच बहिणीच्या नवऱ्याचा धारदार चाकुने राहत्या घरात खून केला.
ठाणे : डोंबिवली एमआयएडीसी भागात याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात मेहुण्यावर खुनाचा दाखल करून त्याला बेड्या
ठोकल्या आहे. रमेश वेलचामी (तेवर) असे अटक केलेल्या आरोपी मेहुण्याचे नाव आहे. तर मारीकन्नी रामास्वामी (तेवर) असे खून झालेल्या जवायाचे नाव आहे. मृतक मारिकन्नी तेवर हा खंबाळपाडा भागात कुटूंबासह राहून इडली विक्रीचा व्यवसाय करीत
होता. शिवाय त्याला दारुचे व्यसन होते. आरोपी घटनास्थळावरुन फरार: ४ एप्रिल रोजी गुरुवारी दुपा दु रच्या सुमारास मृत मारिकन्नी तेवर दारु पिऊन घरी आला होता. त्यानंतर दुपा दु रचे जेवण आटोपल्यानंतर तो दारू नशेत सासरच्या मंडळींना ळीं शिवीगाळ करत होता. त्यावेळी घरात बहिणीचा भाऊ आरोपी रमेश वेलचामी उपस्थित होता. त्याने मारिकन्नी यांना सुरुवातीला शांत राहण्यास सांगितले. मात्र मेहुण्याने सांगूनही तभांडण एवढे विकोपाला गेलेगे ले कि, रागाच्या भरात रमेशने घरातील धारदार चाकुने मारिकन्नीवर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी रमेश घटनास्थळावरुन फरार झाला होता.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध: दरम्यान घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. तर बहिणीच्या नवऱ्याचा चाकूने वार करून खून केल्यानंतर मेहुणा रमेश वेलचामी बेपत्ता झाला. एकीकडे स्थानिक टिळकनगर पोलिस त्याचा शोध घेत होते. तर दुसरीकडे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण पथकानेही समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शशांक शेळके, उपनिरीक्षक मोहन कळमकर, जमादार संजय माळी, प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव, विकास माळी, रमाकांत पाटील, किशोर पाटील, बापूराव जाधव, विश्वास माने, उल्हास खंडारे, बालाजी शिंदे, गोरखनाथ पोटे, विलास कडू, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, राहुल ईशी यांच्या वेगवेगळ्या पथकांकडून फोटो, तसेच मोबाईलच्या नंबरसह तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत होते.
दोन तासातच आरोपी गजाआड: आरोपी हा रमेश मुंबईतील धारावी किंवा तमीळनाडूतील मूळ गावी पळण्याची शक्यता विचारात घेऊन पोलिसांची दोन पथके त्याचा मुंबई, कल्याण रेल्वे स्थानकात शोध घेऊ लागली. त्यातच कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफार्म क्र. 6 वर ताब्यात घेतले. त्याच्याकडे चैन्नई एग्मोर या जलद एक्स्प्रेसचे ई-तिकीट आढळून आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन तासातच आरोपीला गजाआड करण्यात यश आले. आरोपीने कांचनगाव-खंबाळपाड्यात राहणारामारीकन्नी रामास्वामी (तेवर) या बहिणीच्या नवऱ्याचा खून केल्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी सांगितले. आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता अधीक पोलीस कोठडी सुनावली आहे.