मुंबई:महानगरपालिकेचे सर्वात मोठे पशुवधगृह असलेल्या देवनार पशुवधगृहातील तयारीचा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री इ.सि.चहल यांनी आज( दिनांक 31 मे २०२३ )रोजी आढावा घेऊन आमदार महोदयांनी केलेल्या सूचनेनुसार तयारी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
याप्रसंगी आमदार श्री. रईस शेख, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. आशिष शर्मा, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त) श्री. चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (परिमंडळ -५) श्री. हर्षद काळे, देवनार पशुवतगृहाचे महाव्यवस्थापक श्री.
कलीमपाशा पठाण, माजी नगरसेवक तसेच संबंधित महानगरपालिका अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी, देवनार पशुवतगृहाचे महाव्यवस्थापक श्री. कलीमपाशा पठाण यांनी सादरीकरणाद्वारे तयारी कामांची सविस्तर माहिती मान्यवरांना दिली. याप्रसंगी आमदार श्री. रईस शेख मार्गदर्शन करताना म्हणाले की, देवनार पशुवधगृहातील ग्रेझीम यार्ड परिसरामध्ये पर्जन्य जलवाहिन्या टाकणे, अंतर्गत परिसरामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविणे, घनकचरा उचलणे, साफसफाई करण्यासाठी दोन संस्थांची नेमणूक करणे, बकऱ्यांच्या चोरीला आळा घालण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली तयार करणे, म्हैस वर्गीय प्राण्यांच्या धार्मिक पशुवधाची व्यवस्था करणे, वाहन पार्किंगमध्ये ठेवण्यासाठी असलेले प्रवेश शुल्क माफ करणे तसेच मोठा पाऊस आला तर अतिरिक्त पशुवधगृहाची व्यवस्था करण्याची मागणी केली.या सर्व मागण्यांवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी यावेळी दिले.