Heavy Rain Alert : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस (rain) सुरु आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळं महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील 18 राज्यांतील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून मोठं नुकसान झालं आहे. तर यामध्ये आत्तापर्यंत 574 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,देशातील 18 राज्यांतील 188 जिल्ह्यांना पाऊस आणि पुराच्या तडाखा बसला आहे. यामध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. मालमत्तेचं देखील मोठं नुकसान झालं आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये आत्तापर्यंत 574 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तर 497 जण जखमी झाले आहेत. पावसामुळे 8644 गुरेही दगावली आहेत. 8815 घरांचे नुकसान झाले आहे, तर 47,225 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.