पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषद मालमत्ता ई-सर्व्हेक्षण प्रणालीचे उद्घाटन

ठाणे:(प्रेस नोट) जिल्हा परिषद ठाणेच्या जिल्हा व क्षेत्रियस्तरावरील एकूण ९,४७७ स्थावर व जंगम मालमत्तांचे सर्व्हेक्षण करून त्यांच्या नोंदी ऑनलाईन स्वरुपात अद्यावत करणे. मालमत्तांच्या केलेल्या नोंदींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे मार्फत ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून राज्याचे उत्पादन शुल्क तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ठाण्यातील नियोजन भवन येथे […]

Continue Reading

कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये पंचायत समिती शहापूरला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

ठाणे:यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२०२३ मध्ये राज्यातील अतिउत्कृष्ठ जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना विभाग व राज्यस्तरावर पूरस्कार प्रदान करणेबाबत आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये पंचायत समिती शहापूरला तृतीय क्रमांकाचा अत्युत्कृष्ट पंचायत समिती म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. सन २०२१-२०२२ या अहवाल वर्षामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर […]

Continue Reading

पालकांनी शासनमान्य शाळेत प्रवेश घ्या- मा. मुख्य. कार्यकारी अधिकारी

ठाणे:प्राथमिक शिक्षण विभागामार्फत अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापनाला रक्कम एक लाख दंड व नोटीसच्या दिनांकापासून शाळा बंद न केल्याने पुढील प्रत्येक दिवशी रक्कम दहा हजारप्रमाणे दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे. शासकीय कारवाई करताना ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांना […]

Continue Reading

माध्यमिक अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नका’ – शिक्षणाधिकारी माध्यमिक, श्रीम. ललीता दहितुले

संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई जिल्हा परिषद ठाणे मार्फत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २७ माध्यमिक शाळा अनधिकृत असून १० अनधिकृत शाळा सुरू आहेत व १७ शाळांनी शाळा बंद करण्याबाबतचे हमीपत्र सादर केले आहे. तरी पालकांना सुचित करण्यात येते कि पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. अनधिकृत शाळांची यादी […]

Continue Reading

शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार केला तसाच विचार लोकांच्या कल्याणासाठी करा- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साडेतीनशे वर्षांपूर्वी ६ जून रोजी झाला हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखीन दृढ करण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा […]

Continue Reading

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज

ठाणे:(प्रेस नोट) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन’ या संकल्पनेला पुर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तालुका पातळीवर कोपरा बैठक, चर्चा सत्र, प्रभात फेरी, पोस्टरद्वारे व्यापक लोकसहभागाने जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी जनजागृती करणे […]

Continue Reading

ST Bus accident:माळशेज घाटात एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक

मुरबाड तालुक्यातील कल्याण नगर राष्ट्रीय मार्गावर असलेल्या माळशेज घाटात भरधाव एस टी बस व ट्रक यामध्ये सावरणे गावाच्या हद्दीत असलेल्या वळणावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एस टी बसमधील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्र टोकावडे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बस-ट्रकची धडक […]

Continue Reading

पावसाळापुर्व नियोजन करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

ग्रामीण भागात आपात्कालीन पूरपरिस्थितीमुळे साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. नियंत्रण कक्ष व पूरपरिस्थिती नैसर्गिक आपत्तीमुळे आरोग्य विभागातंर्गत ३ पथके वाहन व्यवस्थेसह २४ तास कार्यान्वित करण्यात आले आहे तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यात ३ तज्ञ डॉक्टरांचे पथक वाहन व्यवस्थेसह […]

Continue Reading

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना शेतकऱ्यांना फायदेशीर

ठाणे जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना यावर्षी पहिल्यांदा राबवली जात आहे. यापुर्वी या योजनेत केवळ इंधन खर्च देण्यात येत होता मात्र सध्या यंत्रसामग्री व इंधन खर्च ही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच गाळ वाहून नेण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १५ हजार रुपयांचे अनुदान […]

Continue Reading

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भूमिपूजन सोहळा संपन्न

जिल्हा परिषद, ठाणे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा. डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभा सदस्य, कल्याण यांच्या विशेष प्रयत्नातून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शनिवार, दिनांक ६ मे २०२३ रोजी सायंकाळी ०५:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, नेवाळीजवळील मैदान, तालुका अंबरनाथ येथे डिजीटल […]

Continue Reading