पडघ्यात जलजीवन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भुमीपुजन

भिवंडी


तालुक्यातील पडघा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हर घर जल संकल्पनेनुसार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन योजने अंतर्गत मंजूर नवीन पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा सोमवारी सकाळी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता शिवसेना उपनेते प्रकाश पाटील,सरपंच अमोल बिडवी व ग्रामपंचायत कमीटी यांनी तात्कालिन ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवीन पाणीपुरवठा योजना मिळण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता.

त्यानुसार जलजिवन मिशन अंतर्गत १६ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण यंत्रणेसह नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असुन त्याचे भुमीपुजन सोमवारी पडघा- भादाणे रस्त्यावरील सर्वे नंबर १०१ मधील मैदानात शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शांताराम मोरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश भोईर,अशोक शेरेकर,मजुर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) विश्वास थळे,मनसे भिंवडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी,पडघा सोसायटीचे सभापती डॉ. संजय पाटील, भाजयुमो माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर,माजी जिल्हा परिषद सदस्या श्रेया गायकर, पंचायत समिती माजी उपसभापती वृषाली विशे, गुरुनाथ जाधव,सरपंच अमोल बिडवी,उपसरपंच गिरीश जाधव, पोलीस पाटील राजेश सांळुके ,व्यापारी मंडळाचे अध्यक्ष दिनेश गंधे ,ग्रामपंचायत सदस्या चंदा साळुंके, वृषाली खिसमतराव, रश्मी तेलवणे, रविंद्र विशे, अभिषेक नागावेकर कंत्राटदार जे. व्ही. पाटील उपस्थित होते.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *