भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील एका मोबाईल दुकानाची मागील भिंत फोडून सुमारे आठ लाख 13 हजार रुपये किमंतीचे 29 मोबाईल फोन चोरी करून पळून गेलेल्या चौघा जणांचा टोळीला पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करीत गजाआड केले आहे. त्यांच्या कडून चोरी करण्यात आलेले 29 मोबाईल हस्तगत करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे अशी माहिती कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली आहे.
या बाबतीत पोलिसांनी दिलेली माहिती अशी 27 जुलै रोजी भिवंडीतील कोनगाव येथील एस कलेक्शन या मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आलेल्या चोरट्यांनी दुकानातील 29 मोबाईल चोरी केले होते.या प्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे पोलीस हवालदार घोडसरे,गोरले,पाटील,पाटील,वाकस,
गायकवाड,साळुंखे, खडसरे,पाटील या पथकाने झालेल्या घटनेचा तपास सुरू केला भिवंडी सह कल्याण डोंबिवली आदी परिसरातील 150 सी सी टी व्ही कँमेरे तपासले त्यामध्ये गुन्हयातील चार चोरटे हे कोनगाव येथुन ऑटो रिक्षा व रेल्वेने प्रवास करून पनवेल येथे गेले असल्याचे तपासात समोर आले.तेथून सर्वप्रथम इस्माइल नसरुद्दीन शेख (वय 26) यास ताब्यात घेत चौकशी केली असता,
इतर तीन चोरटे हे चोरीचा माल घेवुन इंदापुर,पुणे येथे पळून गेले असल्याचे समजले.त्यानंतर पोलिस पथकाने इंदापुर,पुणे येथून मोहिउद्दिन नाझिर शेख ऊर्फ मुया (वय 44,)अब्दुल मजीद हसन शेख ऊर्फ मुल्ला (वय 40) इस्माईल नसीरुद्दीन शेख (वय 26) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीचे सर्व मोबाईल नवी मुंबई येथे आपल्या बहिणीच्या घरी ठेवल्याचे आढळून आल्याने तेथून सर्व मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विशेष म्हणजे हे चार ही आरोपी मुळचे झारखंड येथील असून कल्याण डोंबिवली परिसरात फळविक्रेते म्हणून फिरत असत.
त्या दरम्यान चोरी करण्याच्या ठिकाणची रेकी करून रात्री चोरी करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे.या चार ही जणांचा पूर्वेतिहास हा चोरीचा असून या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे अशी माहिती शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली आहे.