भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील कामगार वस्ती वास्तव्यास असलेल्या शांतीनगर परिसरातील झोपडपट्टी विभागात मोठया प्रमाणावर बनावट खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे तक्रारी होत आहेत. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी बनावट जिरे विक्री करणाऱ्यांना अटक
करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांनी धाडसी कारवाई करीत बनावट एव्हरेस्ट मसाले विक्री करणाऱ्यांचा दोघा जणांना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांच्या जवळून सुमारे एक लाख 8 हजार रुपये किमतीचा बनावट मसाल्या चे पाकीट जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी शहरात एका टेम्पो मधून बनावट पॅकिंग केलेला एव्हरेस्ट मसाला विक्री साठी येणार असल्याची ग माहिती शांतीनगर शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळताच त्यांनी पोलीस निरिक्षक विनोद पाटील,पोलीस निरिक्षक (गुन्हे) अतुल अड्डुरकर
उपनिरीक्षक सुरेश घुगे,हे.काँ.संतोष पवार,श्रीकांत पाटील, किरण जाधव,नरसिंह क्षीरसागर,रोशन जाधव,रविंद्र पाटील,
तौफिक शिकलगार या विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करून सदर पोलीस पथकासह जब्बार कंपाऊंड शांतीनगर या रस्त्यावर सापळा रचून केलेल्या कारवाई करीत जोगेश्वरी येथून आलेला ₹एम एच 03 सी डी 0679) हा संशयित टेम्पो आला असता त्यास थांबवून त्याची तपासणी केली.त्यामध्ये एक लाख 8 हजार रुपये किमतीचे एव्हरेस्ट चिकन मसाला,एव्हरेस्ट मटण मसाला व मॅगी मसाल्याचा बनावट मालाचे पॅकेट आढळून आले.टेम्पो चालक महेश लालताप्रसाद यादव व माल विक्री साठी आलेला मोहमद सलमान मोहमद अफजल प्रधान (दोघे रा. जोगेश्वरी) यांना ताब्यात घेतले. चौकशी मध्ये हा बनावट माल गुजरात राज्यातील सुरत येथील फॅक्टरी मध्ये बनवून महाराष्ट्रासह गुजरात,मध्या प्रदेश,उत्तर प्रदेश या राज्यांत विक्री केला जात असल्याचे समजल्याने पोलिस पथकाने सुरत येथील ईश्वरनगर सोसायटी, पर्वतगाव येथे छापा टाकला असता तेथे करण सुरेशभाई मेवाडा हा बनावट मसाला तयार करीत असल्याचे आढळून आल्याने पोलिस पथकाने तेथील कच्चा माल व मशीन व फॅक्टरी सिल करून कारवाई केली आहे.
खरा अधिकृत एव्हरेस्ट मसाले पाकिटावर ई हॉलमार्क असतो परंतु बनावट पाकिटावर असा हॉलमार्क आढळून आला नाही.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट करीत एव्हरेस्ट कंपनीचे सेल्समन सचिन काशीनाथ पासलकर यांच्या तक्रारी वरून या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी सुध्दा आपण वापरीत असलेले पॅक बंद खाद्य पदार्थ खरेदी करीत असताना मालाची मुदत दिनांक ची पडताळणी खात्री करून घ्यावी नंतरच माल खरेदी करावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी केले आहे.