भिवंडीत 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त,गुन्हे शाखेची धडक कारवाई..

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील अंजुरफाटा खारबाव रस्त्यावर गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून केलेल्या धाडसी कारवाईत दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून सुमारे 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे.दरम्यान न्यायालयात हजर केले असता संबंधित आरोपींना 6 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार भिवंडी गुन्हे शाखेतील पोलिसांना गोपणीय माहिती मिळाली की परराज्यातून दोन व्यक्ती गांजा विक्री साठी येणार आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेचे वपोनि सचिन गायकवाड,ए.के.आफळे  यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज केदार,सपोनि श्रीराज माळी यांच्या पोलिस पथकाने भिवंडी अंजुरफाटा – वसई महामार्गा वरील कालवार गांव परिसरातील  गुंजन ढाबा येथे सापळा रचला असता दोघे संशयित त्याठिकाणी आले.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या जवळ सुमारे 16 लाख 68 हजार  504 रुपये किमतीचा 37 किलो 394 ग्रॅम वजनाचा ओलसर हिरवट मळकट पान फुलांचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्रीकरीता बाळगला असल्याचा आढळून आला.पोलिसांनी गांजा बाळगणारे राजकिशोर धूतकृष्णा बेहरा (वय 31) व सागर सुरेंद्र नायक, (वय 29 दोघे मुळ राहणार ओडिसा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक केली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास भिवंडी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *