भिवंडी: भिवंडी व ठाणे शहराच्या सीमेवरील उल्हास नदी व ठाणे खाडी पात्राता बेकायदेशीरपणे रेती उत्खनन सुरू सर्रासपणे सुरू आहे याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,रेती गट विभाग तहसीलदार राहूल सारंग यांच्याकडे तक्रार जाताच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या विशेष पथकाने भिवंडी तालुक्यातील काल्हेर ते वेहेळे, कोन गांव येथील खाडीपात्रात भिवंडी अपर मंडळ अधिकारी अतुल नाईक व खारबाव मंडळ अधिकारी सुधाकर कामडी यांच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत एकूण 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पेटवून नष्ट करण्यात आला.तसेच या बाबतीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शासनादेशावरून उल्हास नदी पात्रात रेती उत्खनन करण्यास बंदी आहे असे असताना काही महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नदीपात्रात बेकायदेशीरपणे भीतीचे उत्खनन सुरू आहे याबाबत तक्रार जाताच भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकाऱ्याचे एका पथकाने खाडी किनारी तपासणी पाहणी केली असता भिवंडी तालुक्यातील काल्हेर ते वेहेळे, कोन गांव येथील खाडी पात्रात एक बार्ज व एक संकशन पंप आढळून आले.कारवाई पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील कामगारांनी पाण्यात उडी मारून ते पसार झाले.परंतु पलायन करण्यापूर्वी त्यांनी बार्ज चा वाॅल काढल्याने त्यात पाणी शिरले व अशा परिस्थितीत बोटीच्या सहाय्याने बार्ज ओढून आणने शक्य नसल्याने तो तिथेच बुडवण्यात आला.तर सक्शन पंप बोटीच्या साहाय्याने काल्हेर बंदर येथील खाडी किनारी पाण्याबाहेर काढून त्याचा पुन्हा वापर होऊ नये म्हणून गॅस कटर च्या सहाय्याने कापून नष्ट करण्यात आला आहे.या कारवाईत एकूण 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून याबाबत नारापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच रेती विभाग ठाणे तहसीलदार राहुल सारंग यांच्या पथकाचे मंडळ अधिकारी दिपक गायकवाड यांच्या पथकाने मोठागाव ठाकुर्ली रेतीबंदर ते कोपरखाडी खाडीपात्रात एक बार्ज अनधिकृतपणे रेती उत्खनन करत होते यावेळी सदर बार्जवर काम करणारे ४ मजूरांनी पकडले जाऊ या भितीने खाडीपात्रात उडया मारून पळून गेले. बार्ज लोखंडी व अवजड असल्याने खाडीपात्रातून बाहेर काढता आली नाही. त्यामुळे सुमारे 12 लाख रुपये किमंतीचे बार्जच्या इंजिनमध्ये साखर व रेती टाकून बार्जचे इंजिन पुर्णपणे नादुरूस्त केले. तसेच सदर बार्जवर डिझेल टाकून बार्जचे इंजिन व इतर साधनसामुग्री पेटवण्यात आले व बार्ज पूर्णपणे नादुरूस्त केले.