भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात असलेल्या ठाकराचा पाडा येथील एका भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत गोदाम व नजीक असलेल्या वाहन पार्किंग मधील अनेक वाहनांना झळ लागल्याने वाहन व मालमत्तेचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चार तास पाण्याचा मारा करीत ही आग आटोक्यात आणून विझवली आहे.याआधी संदर्भात पोलिसांनी नोंद घेऊन चौकशी तपास सुरू केला आहे.
भिवंडी तालुक्यातील ठाकराचा पाडा येथील रस्त्यालगत एका मोकळ्या जागेत भंगार साठवणुकीचे गोदाम असून गुरुवारी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास येथे अचानक आग लागली. या आगीत भंगार गोदामात साठवलेले काही रासायनिक द्रव्ये व केमिकल जळत असल्याने ही आग झपाट्याने पसरत नजीकच असलेल्या वाहनतळ पर्यंत पोहचली.या घटनेची माहिती मिळताच भिवंडी पालिकेची एक अग्निशामक दलाचा जवानांनी घटनास्थळी दाखल झाली.परंतु तो पर्यंत या आगीचे रौद्र रूप धारण केल्याने ही भिषण पसरत गेली.सदर आग जवळील बंगल्या पर्यंत गेल्याने तेथील रहिवासी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले व त्यानंतर मोकळ्या जागेत उभी असलेली वाहन उचलून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भिषण आगीत एक जीप,दोन ट्रक,चार दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत या कशामुळे लागली याबाबत माहिती मिळाली नसून पोलिसांनी या आगीची नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे.