भिवंडी : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करताना, आपण समाजातील सर्व स्तरातील महिला जिथे काम करतात, तिथे त्यांचा योग्य तो मानसन्मान होणे आवश्यक, तसेच त्यांना घरीदेखील या आपल्या परीने मान सन्मान देणे आवश्यक आहे, आपल्या रितीरिवाजाप्रमाणे स्त्री ही पूजनीय आहे, स्त्रीला मातृत्व दातृत्व, याची देणगी आहे, आपण स्त्रीशक्ती रुपात तिची पूजा करतो, भारत देशाला आपण मातेच्या रूपात बघतो आहे म्हणून भारताला सुद्धा आपण भारत माता म्हणून उल्लेख करतो अशा स्त्रीवर कुठेही अन्याय होणार नाही त्याच्यावर अत्याचार होणार नाही, याची दखल सर्व समाजाने घेणे आवश्यक आहे तेच खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन असेल असे प्रतिपादन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुख्य कार्यक्रमाचे आयोजन स्व .गाजेंगी सभागृह करण्यात आले होते. त्यावेळी पालिका आयुक्त अजय वैद्य बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, विठ्ठल डाके, उपायुक्त मुख्यालय दीपक झिंजाड, समाज कल्याण उपायुक्त प्रणाली घोंगे , कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी डॉ.
अरुंधती भालेराव , वैद्यकीय अधिकारी बुशरा सय्यद, भिवंडी आय.एम. एच्या अध्यक्षा डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पालिका आयुक्त अजय वैद्य पुढे की, म्हणाले की भारतीय संस्कृती हे महिलांचा सन्मान करणारी संस्कृती आहे. पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी अनेक पौराणिक दाखले देत महीलांचा महत्व विषद केले. आज अनेक महिला विविध ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. पालिकेत कार्यरत असलेल्या महिला देखील विविध ठिकाणी चांगले काम करीत आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे वैद्यकीय आरोग्य विभागात अनेक महिला चांगल्या प्रकारे काम करत आहेत. चार महिला अधिकारी आज संपूर्ण वैद्यकीय विभाग सांभाळत आहेत. या वैद्यकीय विभागात व आरोग्य विभागात प्रत्यक्ष जागेवर वस्तीमध्ये, नागरिकांमध्ये मध्ये जाऊन काम करणाऱ्या अशा चांगल्या महिला कर्मचारी यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात येत आहे ही अभिनंदनीय बाब आहे. सर्व महिला कर्मचारी यांनी आपल्या चांगल्या कामाचा आदर्श निर्माण करावा असे देखील पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी नमूद केले.
यावेळी डॉ.अरुंधती भालेराव यांचा महिलांच्या जीवनावर आधारित ती आणि मी हा विशेष कार्यक्रम महिलांच्या आयुष्यावर विविध टप्प्यांवर स्त्री जन्मापासून तिच्या वार्धक्यापर्यंत प्रवास प्रसंगानुरुप गाण्याद्वारे सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त प्रणाली घोंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता समाज कल्याण विभाग प्रमुख प्रकाश वेखंडे व त्यांच्या सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली.