भिवंडी: माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी शहर स्वच्छता मोहिमेवर विशेष लक्ष दिलेलेआहे. मुख्यमंत्री यांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्याचे सूचना सर्व महापालिका यांना केल्या आहेत. त्यानुसार सर्व रस्त्यांची साफसफाई करणे कचरा मुक्त शहर करणे , धूळ प्रदूषण कमी करणे व शहर स्वच्छ करणे यामध्ये झाडलोट , रस्ते धुणे, त्यानंतर अनधिकृत बॅनर पोस्टर्स यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. दैनंदिन शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पालिका कर्मचारी यांची आहे तशीच सर्व नागरिकांची देखील आहे

नागरिकानी देखील वेळच्या वेळेला कचरा घंटा गाडीतच नेमून दिलेल्या ठिकाणी व कचराकुंडीत व घंटागाडीचाच कचरा टाकावा, रस्तावर कचरा टाकावा असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले, नवीन वर्ष 2024 ची शहरात स्वच्छता अभियानाने करण्यात आली, भिवंडी शहरातील एसटी स्टँड ते नागाव रोड या भागातून या सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे कार्याला सुरुवात पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या उपस्थितीत करण्यात आली त्यावेळी पालिका आयुक्त अजय वैद्य बोलत होते. यावेळी पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, संजय हेरवाडे, आरोग्य उपायुक्त दीपक झिंजाड, समाज कल्याण उपायुक्त प्रणाली घोंगे, अन्य सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालिका आयुक्त पुढे म्हणाले की,स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत एक कार्यप्रणाली विकसित करण्यात येणार आहे त्यानुसार आपल्या पालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छता अभियान ही लोक चळवळ झाली पाहिजे लोकांचा त्याच्यात सहभाग पाहिजे तरच कोणतेही अभियान यशस्वी होते. आयुक्त यांनी स्वतः एसटी स्टँड पासून ते सागर प्लाझा पर्यंत झाडू मारत सर्वत्र साफसफाई मोहिमेचे नेतृत्व केले. त्यावेळी त्यांनी काही हॉटेल, पान टपऱ्या, चहाची दुकाने यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.
नागरिकांनी पान टपऱ्या चहाची हॉटेल अन्या दुकानदार यांनी आपल्या दुकानाजवळ एक कचऱ्याकरता स्वतंत्र कचरा पेटी ठेवायची आहे त्यामध्येच नागरिकांनी कचरा टाकावा. पान टपऱ्या, चहाची दुकान येथे कचरा टाकला जातो त्यामुळे रस्त्यावर कचरा निर्माण होतो. सर्व हॉटेल चालक-मालक चहाचे दुकानदार आणि पान टपऱ्याधारक यांना याद्वारे सत्ता आदेश देण्यात येतात की त्यांनी आपल्या दुकानासमोर कोणत्या प्रकारचा कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. या सर्वंकष स्वच्छता अभियानाच्या नियोजनाबाबत पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करण्यात आले. असून त्यांच्या स्वच्छ भारत अंतर्गत मुख्य रस्ते, उड्डाणपूल याची सफाई करून धुवून घेण्यात येत आहेत. रस्त्यावर लावलेले अनाधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर्स काढून घेणे हे देखील काम करण्यात येत आहे. नवीन वर्षाची सुरूवात स्वच्छते मोहीम पासून करावी हा पालिकेचा संकल्प असून शहरातील प्रमुख रस्ते प्रत्येक प्रभाग समिती मधील एक याप्रमाणे यामध्ये प्रभाग समिती क्रमांक एक अंतर्गत एसटी स्टँडच्या नागाव गायत्री नगर, प्रभाग समिती दोन अंतर्गत अमजदिया मशीद ते गणेश सोसायटी, प्रभाग समिती क्रमांक तीन अंतर्गत आसबीबी मजीद ते मानसरोवर आयुक्त बंगला, प्रभाग समिती चार अंतर्गत गोल्डन हॉटेल, देवजी नगर भंडारी कंपाउंड आणि प्रभाग समिती पाच अंतर्गत तीनबत्ती ते मनपा मुख्यालय असेच विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.
शहरातील पान टपरी धारक, चहा हॉटेल, हॉटेल मालक यांनी आपल्या दुकानासमोर एक स्वतंत्र कचरापेटी ठेवावी ज्यामध्ये नागरिकांनी कचरा कुंडीत व नेमून दिलेल्या ठिकाणी कचरा टाकावा, कोठेही रस्त्यावर कचरा टाकू नये यापुढे अशी स्थिती आढळल्यास संबंधित दुकानदार, हॉटेल मालक , पान टपरी धारक यांच्या नियमावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पालिका आयुक्त यांनी दिला.