भिवंडी:संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. मा. पंतप्रधान महोदय यांनी सदरचे वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारता सारख्या देशात ग्रामीण भागात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख खाद्य पदार्थ आहेत, हा आहार पोष्टीक व सकस आहे, आज आपण शहरी भागात आपल्या दैनंदिन आहारात आहारात मैदा, तांदूळ, गहू यांचे पदार्थ याचा वापर केला जातो हा आहार आरोग्याला अपायकारक आहे, याचा वापर कमीत कमी करून ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळ , राजगिरा या सकस पोष्टीक तृण धान्य आहाराचा समावेश करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले.

अशा तृण धान्याचा प्रचार व प्रसार करण्याचा एक भाग म्हणून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका समाज कल्याण विभाग व जिल्हा कृषी विभाग ठाणे यांच्या सहकार्याने तृणधान्य महोत्सव याचे आयोजन दि. 29 डिसेंबर रोजी स्वर्गीय राजय्या गांजेंगी सभागृह येथे करण्यात आले आहे, त्यावेळी पालिका आयुक्त अजय वैद्य बोलत होते.
पालिका आयुक्त पुढे म्हणाले की, सध्या जंक फूडचा जमाना आहे पण हे जंक फूड हे आरोग्यासाठी कशाप्रकारे अपायकारक आहेत याबाबत सूचना केल्या असून तृणधान्य हे माणसाच्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आणि लाभदायक आहे याबाबत मार्गदर्शन केले. तृणधान्य यापासून तयार केलेले विविध पदार्थ व आपल्या आहारात तृणधान्याचा समावेश करणे आवश्यक आहे. अशा तृण धान्य याचे महत्व पटविण्याकरता कृषी विभाग यांच्यावतीने कार्यक्रम स्थळी अधिकारी कर्मचारी यांचे करिता स्टॉल लावण्यात आले होते. महानगरपालिकेच्या वतीने मोफत जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही चालू आहे, जेणेकरून महिलाना तसेच नागरिकांना पौष्टिक तृणधान्य वर्षभर उपलब्ध होऊ शकेल असेही आयुक्त अजय वैद्य यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला पालिका आयुक्त अजय वैद्य, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,
कृषी विभागाचे सचिन थोरवे, राहुल म्हसणे, उपायुक्त समाज कल्याण प्रणाली घोंगे, लेखा व वित्त अधिकारी किरण तायडे, नगररचनाकार अनिल येलमाने, वैद्यकीय आरोग्य अधिकारी बुशरा सय्यद, शहर अभियंता सुरेश भट, सहाय्यक आयुक्त आरोग्य फैसल तातली व सर्व प्रभाग अधिकारी, उद्यान विभाग प्रमुख निलेश संखे, समाज कल्याण विभाग प्रमुख प्रकाश वेखंडे , स्नेहल पुण्यार्थी, समीर जवरे, नितेश चौधरी इत्यादी उपस्थित होते.