भिवंडी :पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे या स्वच्छता मोहिमेंतर्गत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा देखील संकल्प आहे. यामध्ये सिंगल युज प्लास्टिक वापर करू नये अशा शासनाच्या सूचना आहेत व त्यानुसार पालिकेने अधिनियम पारित केले आहेत.त्यानुसार पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज विशेष पथकाने आज कारवाई केली. नजराना कंपाउंड , शिवाजीनगर, गुरुदेव फरसाण मार्ट , भिवंडी टॉकीज परिसर, तीनबत्ती बाजारपेठ, बॉम्बे फरसाण मार्ट या सर्व भागात पालिकेने विशेष मोहीम राबवली यामध्ये एकूण 800 किलो प्लास्टिक जप्त करून, ऋषभ प्लास्टिक, विनोद मगनलाल, गुरुदेव फरसाण मार्ट विक्रेते, व एकूण 35,000 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.. या मोहिमेत आरोग्य विभाग सहायक आयुक्त फैसल तातली, पश्चिम विभाग प्रभाग समिती 4 व 5 चे आरोग्य निरीक्षक हेमंत गूळवी, आरोग्य निरीक्षक शशी घाडगे, राजेंद्र घाडगे, प्रभाग समिती क्रमांक 4 व 5 मधील आरोग्य कर्मचारी पथकाने कारवाई केली. शहरात
यापुढे सिंगल युज प्लास्टिक, प्रतिबंधात्मक प्लास्टिक विक्रेते, व वापरणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिला आहे. सिंगल युज प्लास्टिक वापर करताना तीन वेळा आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई आहे आणि चौथ्या वेळेला नियमानुसार कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो. या पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली आहे.
