भिवंडी :मा. पंतप्रधान महोदय यांनी गेल्या वर्षी वीर बाल दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने परिपत्रक जारी केले. त्यानुसार पालिकेत आज वीर बाल दिवस कार्यक्रम झाला. पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी साहिबजादा बाबा जोरावर सिंह व आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळेला पालिका अतिरिक्त आयुक्त यांनी सर्व उपस्थितांना वीर बाल दिनाबाबत माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त म्हणाले की,
माता गुजरी, श्री गुरु गोविंद सिंग जी आणि चार साहिबजादांचे सामर्थ्य आणि धैर्य लाखो लोकांना प्रेरणा देते. त्याने कधीही अन्याय स्वीकारला नाही, मुघलांनी त्यांच्यावर अनेक अत्याचार केले,अन्याय झाले तरी त्यांनी आपले धर्मांतरण केले नाही, प्रतिकूल परिस्थिती त्यांनी मात करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपला सर्वस्व त्याग केला, त्याच्याबद्दल आणि त्याच्या मूल्यांबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती असणे आवश्यक आहे.
साहिबजादा बाबा जोरावर सिंह व आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांना २६ डिसेंबर 1705 रोजी
जिवंतपणे भिंतीत फेकण्यात आले आणि ते दोघेही वयाच्या ७ आणि ९ व्या वर्षी शहीद झाले. अधर्म व अन्याया विरोधात त्यांनी इतक्या लहान वयात आपले बलीदान दिले. यांच्या बलिदानाची सर्वांस माहिती असायला हवी असेही पालिका अतिरिक्त आयुक्त यांनी नमूद केले.
गेल्या वर्षी माननीय पंतप्रधान महोदय यांनी सदरचा दिवस वीर बाल दिवस म्हणून घोषित केला होता. या कार्यक्रमाला उपायुक्त प्रणाली घोंगे, उपायुक्त रमेश थोरात, शहर अभियंता सुरेश भट, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता संदीप पटणावर, आरोग्य सहायक आयुक्त फैसल तातली, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, क्रीडा अधिकारी शरद कलावांत, सहायक आस्थापना विभाग प्रमुख कल्याणी चन्ने अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
