भिवंडी महानगरपालिकेतर्फे अभय योजनेला मुदतवाढ, कर भरून पालिकेला सहकार्य करावे…आयुक्त अजय वैद्य

भिवंडी

भिवंडी: पालिका मालमत्ता कराची वसुली परिणामकारक होण्याच्या दृष्टीने प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य हे वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून करदाते नागरिक यांचे करिता मालमत्ता करावरील व्याज माफी अभय योजना दिनांक ९ डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान जाहीर करण्यात आली होती, या योजनेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, नागरिकांचा कर भरण्याकडे कल लक्षात घेता सदर अभय योजनेला दिनांक 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मालमत्ता कराचा एक रकमी कराचा भरणा करणारे सर्व कर दाते यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दिनांक 31 डिसेंबर नंतर अभय योजना व्याज माफी देण्यात येणार नाही, तरी नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे कर विहित मुदतीत भरून पालिकेला सहकार्य करावे, जे कर दाते आपल्या कराचा भरणा वेळच्या वेळेला करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध नियमानुसार सक्त कारवाई करण्याचे आदेश देखील पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी प्रभाग अधिकारी व कर मूल्यांकन विभागाला दिले आहेत. आपला कर हा शहराचा विकासाकरताच वापरला जात असतो. शहरात विविध विकास कामे राबवणे त्याच्याकरता निधीची आवश्यकता असते. जर करातून महसुली उत्पन्न होत नसेल तर शहराचा विकासाला चालना मिळणार नाही. आपल्या शहरात मूलभूत सोयीसुविधा देणे आवश्यक आहे, .शहराचा विकास साधण्यासाठी मालमत्ता धारकांनी आपला मालमता कर वेळेच्या वेळेला भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सर्व शहरवासिय यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *