भिवंडी: माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने आज पालिका मुख्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता संदीप पटणावर, सामान्य प्रशासन विभाग सहायक आयुक्त बाळाराम जाधव, आरोग्य विभाग सहायक आयुक्त फैसल तातली, प्रभाग समिती 3 चे सहाय्यक आयुक्त जगदीश जाधव, प्रभाग समिती क्रमांक 5 चे सहायक आयुक्त राजेंद्र वरळीकर, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, पर्यावरण विभाग प्रमुख नितेश चौधरी, पूर्व विभाग आरोग्य निरीक्षक जे.एम.सोनावणे, अतिरिक्त आयुक्त यांचे स्विय सहायक प्रकाश पाटील, एन. यू.एल.एम. विभाग प्रमुख कैलाश पाटील उपस्थित होते.
