भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने बचत गट महिलांकरता जल दिवाळीचे आयोजन, पाणी बचत याबाबत केली जनजागृती

भिवंडी



भिवंडी:केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पाणी पुरवठा अभियंता संदीप पटणावर यांनी बचत गटांच्या महिलांकरता जल दिवाळीचे आयोजन टेमघर येथील स्टेम वॉटर वर्क्स च्या आवारात केले होते. पालिकेच्या पाणी पुरवठा व समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त वतीने जल दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त प्रणाली घोंगे, समाज कल्याण विभाग प्रमुख स्नेहल पुण्यार्थी, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, दीनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे संजय ठाकरे, कैलास पाटील, उपस्थित होते.
बचत गटातील पन्नास बचत गटांचे अध्यक्ष आणि यांच्या करता या जल दिवाळीच्या आयोजन करण्यात आले होते. स्टेमचे महेश भोळे प्रभारी प्रभारी उप अभियंता, अनिल चौधरी महाव्यवस्थापक, दिनेश लष्करे शाखा अभियंता, अर्पित अग्रवाल शाखा अभियंता यांनी या सर्व बचत गटातील महिलांचे स्वागत करून बचत गटातील महिलांना स्टेमच्या पाणी पुरवठा उपक्रमाची माहिती दिली. स्टेमचे
व्यवस्थापक अनिल चौधरी यांनी धरणापासून येणारे अशुद्ध पाणी यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते व शुद्ध पाणी पुरवठा घरा पर्यंत कसा केला जातो याची सगळी माहिती या बचत गटातील महिलांना दिली. तर याप्रसंगी पालिका उपायुक्त प्रणाली घोंगे यांनी नमूद केले की महिलांकरता पाणी व पाण्याकरता महिला ही मुख्य कल्पना आहे. आपल्या सर्वांच्या पाणी दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्व, धरणापासून आपल्या घरापर्यंत पाणी येण्याकरता किती खर्च करावा लागतो आणि किती मनुष्यबळ व प्रक्रिया करावी लागते, पाणी शुद्धीकरण प्रत्यक्ष भेटीचा प्रत्यक्ष अनुभव पाणी वाचवा व पाणी वाचवा याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून पाणी हे अनमोल आहे पाण्याचा वापर जपून करावा ही असे आवाहन प्रणाली घोंगे यांनी केले.याप्रसंगी सर्व बचत गट महिलांना केले पाण्याची बचत हीच काळाची गरज आहे याकरता पाणी बचतीचा संकल्प सर्व महिलांनी करून पाणी बचतीची शपथ देखील घेतली. व महिलांना महानगरपालिकेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या व अल्पपोहराची देखील व्यवस्था करण्यात आली होती. या जल दिवाळी बाबत बचत गटाच्या महिला अध्यक्ष नलिनी चौधरी, चंदा बॅनर्जी, सुदामनी लांडगे, सविता पाटील, शुभांगी सेवक, श्रुती उत्तेकर यांनी आपली मनोगत देखील व्यक्त केली आणि पाण्याचे महत्व विषद केलं. या स्तुत्य उपक्रमाबद्दल या सर्व बचत गटाच्या महिलांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते असे नमूद करून त्याबद्दल केंद्र शासन व पालिकेचे आभार देखील मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *