भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन ताफ्यात दोन मिनी फायर इंजिन दाखल झाली त्याचे लोकार्पण पालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य विजयादशमी, दसऱ्याच्या मुहूर्तावर पालिका मुख्यालय आवारात केले.
जिल्हा नियोजन समिती ठाणे यांच्या मंजूर वार्षिक निधीतून दोन मिनी फायर इंजिन गाड्या खरेदी करण्यात आल्या. एका गाडीची अंदाजे किंमत 43 लाख आहे दोन गाड्यांची किंमत 86 लाख आहे. या गाड्यांमध्ये 30 मीटर होज पाईप ची सोय देण्यात आली आहे, मिस्ट टेक्नॉलॉजी पंप, कमी पाण्यात वॉटर स्प्रे, फोम बनवून आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यात येते. या गाड्यांचा वापर जेथे मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणे करण्यात येईल, भिवंडीतील अरुंद रस्ते लक्षात घेता अशा गाड्यांचा वापर करता येईल. पालिकेच्या ताफ्यात 5 फायर इंजिन , 1 रेस्कु व्हॅन, व दोन मिनी फायर इंजिन यासह एकूण आठ गाड्यांची क्षमता झाली आहे. भिवंडी सारख्या शहरात तसेच आजू बाजूच्या परिसरात केमिकल गोडावून आहेत त्याठिकाणी आगी लागण्याचे प्रकार होत असतात अशा वेळी कमी जागेच्या ठिकाणी या दोन मिनी फायर इंजिन याचा वापर करता येईल अशी माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली.
यावेळी अग्निशमन अधिकारी राजेश पवार, सहायक आयुक्त तथा वाहन विभाग प्रमुख बाळाराम जाधव , प्रभाग अधिकारी सुदाम जाधव, राजेंद्र वरळीकर, फैसल तातली, सोमनाथ सोष्टे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख संदीप पटणावर,समाजसेवक आनंद गद्रे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, अग्नीशमन दलातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.