भिवंडी: माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळेला प्रभाग समिती 2 चे सहाय्यक आयुक्त फैसल तातली, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, प्रभाग समिती किमान 1 चे कार्यालय अधिक्षक लक्ष्मण कोकणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विभाग प्रमुख नेहाला मोमीन, तुषार भालेकर, इत्यादी उपस्थित होते. आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. या वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तक दर्शनी भागात ठेवण्यात आली होती. सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विषद केले व सर्वांनी निदान किमान एक तास तरी अवांतर वाचन करावे असे आवाहन देखील बाळाराम जाधव यांनी केले.
