अभय योजना, व्याज माफी योजनेचा फायदा घेऊन करदात्या नागरिकांनी आपले कर वेळीच भरावेत व पुढील कारवाई टाळावी: अजय वैद्य

भिवंडी

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या मिळकतीवरील मालमत्ता कराची वसुली करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या तरतुदीनुसार अनुसुची “ड” चे प्रकरण 8 (कराधान नियम) मधील नियम 51 अन्वये मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये (व्याजात सूट) देण्याकरिता “अभय योजना 2023 2024” लागू करण्यात येत आहे. या योजनेचा कालावधी
दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 ते दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 एकत्रित मालमत्ता कर भरणान्या करदात्यास ही व्याज माफी मिळेल असे पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी जाहीर केले. महानगरपालिका हद्दीतील तमाम करदात्यांना अभय योजनेमध्ये शास्तीमध्ये (व्याजामध्ये) 100% माफी देण्यात येईल. ही योजना 2023 2024” या सवलतीच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व आपल्या मालमत्तेवरील कर तात्काळभरून पुढील होणारी कायदेशीर कारवाई टाळून महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे. हा कराचा भरणा Online कर पद्धतीने देखील करता येणार आहे.

https://propertytax.bhiwandicorporation.in वेबसाईटचा वापर करावा. जे आपल्या कारणाचा कराचा भरणा करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध 31 ऑक्टोबर नंतर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.कारवाई टाळा व कर भरून आपल्या शहराच्या विकासात हातभार लावा, असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *