भिवंडी: संयुक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने १३ ऑक्टोबर हा आपत्ती निवारण दिवस म्हणून घोषित केला आहे. राज्य शासनाने दिनांक ०८ सप्टेंबर २०१७ रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून दरवर्षी सर्व जिल्ह्यामध्ये व राज्य पातळीवर दिनांक १३ ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्याबाबत तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये या दिवशी रंगीत तालीम घेण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या अनुषंगाने भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेमध्ये दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम पार पडला. महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. अजय वैद्य यांचे निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री. विठ्ठल डाके, उपआयुक्त मुख्यालय डॉ. श्री. सचिन माने, उपआयुक्त (अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण) श्री. दीपक झिंजाड, सर्व नियंत्रण अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख साकिब खर्बे, जनसंपर्क अधिकारी श्री. मिलिंद पळसुले तसेच सर्व विभागप्रमुख व सर्व प्रभाग अधिकारी व महापालिकेचे अधिकारी / कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शवून प्रतिज्ञा घेतली.
