पुढील लोकशाही दिन ०६ नोव्हेंबर २०२३ त्याकरिता दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करावेत
प्रेस रिलिज
शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.प्रसुधा२०११प्र.क्र.१८९/११/१८२,दि.२६ सप्टेंबर २०१२ रोजीच्या परिपत्रकानुसार महानगरपालिका स्तरावरीत लोकशाही दिन पहिल्या सोमवारी म्हणजेच दि.०३/१०/ २०२३ रोजी सकाळी १०:०० वा. मा. आयुक्त सो यांचे कान्फरन्स हॉल, तिसरा माळा, नवीन प्रशासकिय इमारत, भिवंडी येथे प्रशासक तथा आयुक्त, अजय वैद्य यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करणेत आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त (मुख्यालय) सचिन माने, उपायुक्त आरोग्य दीपक झिंजाड व अधिकारी वर्ग ऊपस्थित होते.
सदर लोकशाही दिनी १ तक्रार प्राप्त झाली असून सदर तक्रार प्रभाग समिती क्रमांक ५ शी संबंधीत असून प्राप्त तक्रारीवर तात्काळ नियमानुसार कार्यवाही करून, त्याची माहिती संबंधित अर्जदार यांना देण्याविषयी प्रशासकांनी आदेश दिले आहेत. यावेळी संबंधित विभाग प्रमुखांची आढावा बैठकही घेण्यात आली, यामध्ये माहिती अर्ज, अपिल, मा. पंतप्रधान पोर्टल, आपले सरकार पोर्टल, लोकायुक्तांकडील प्रकरणे, लोकप्रतिनिधीच्या पत्रांना, लेखा आक्षेप विहित मुदतीत ऊत्तरे देऊन प्रकरणे निकाली काढणेबाबत सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर नवरात्र उत्सव 2023 कामी करावयाच्या उपायोजनेबाबत आयुक्त यांनी विभागांना सूचना दिल्या
पुढील लोकशाही दिनानिमित्त नागरीकांना विनंती करण्यात येते की, दि.०६/११/२०२३ रोजीच्या लोकशाही दिनासाठी त्यांनी आपली तक्रार तीन प्रतीत दि.२०/१०/२०२३ पूर्वी माहिती व जनसंपर्क विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे. लोकशाही दिनी अर्जदार यांनी स्वस्तः उपस्थित राहणे आवश्यक आहे. अर्जदार यांची तक्रार/
निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तक्रारदारांबरोबर त्रयस्ताने येण्याची आवश्यकता नाही. एका तक्रारी अर्जात एकच तक्रार असावी. एकापेक्षा अनेक तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रारदाराने प्रथम मनपा स्तरावरील
लोकशाही दिनामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. लोकशाही दिनांत खालील बाबींशी संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
१) न्यायप्रविष्ट प्रकरणे
२) राजस्व / अपिल
(३) सेवा विषयक,
आस्थापनाविषयक बाबी
४) विविध नमुन्यांत नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज.
५) अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यांत येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज.
६) तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर.
तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या/लोकप्रतिनिधीच्या/संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज स्विकारला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी असे जाहीर आवाहन भिवंडी महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे.