भिवंडी :देशात सर्वत्र 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या दरम्यान स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे.या पंधरवड्याची सांगता १ ऑक्टोंबर रोजी संपूर्ण देशभरात ” एक तारीख एक तास ” या कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात येत आली. पालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते धामणकर नाका या परिसरात करण्यात आला.या ठिकाणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह पालिका आयुक्त अजय वैद्य, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,
उपायुक्त दीपक झिंजाड, सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे,मुख्य आरोग्य निरीक्षक जे एम सोनवणे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांसह भाजपा शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील, माजी सभागृह नेते सुमित पाटील, सर्व पालिका अधिकारी,कर्मचारी,
स्वच्छता विभागाचे व पालिकचे अन्य कर्मचारी यांचे पथक, स्थानिक नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था मध्ये इस्कॉन, रोटरी क्लब,
धामणकर नाका मित्र मंडळ, कादरिया मस्जिद ट्रस्ट,बैतूला मस्जिद,श्री साई सेवा संस्था,नवजीवन सामाजिक संस्था,
अरेबिया मदरसा सैलानी चौक,बी एन एन महाविद्यालय, व स्वयं सिध्दी महाविद्यालयातील एन सी सी व एन एस एस स्वयंसेवक, पालिकेच्या सर्व शाळा , महाविद्यालय यांचे विद्यार्थी नागरीक मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहिमे मध्ये सहभागी झाले होते.
स्वच्छता ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया असून आपल्या देशाचा विकास होत असताना देश स्वच्छ व सुंदर असणे सुद्धा गरजेचे आहे.आणि त्याच भावनेतून ही संकल्पना देशभरात राबविण्यात येत आहे.आणि या संकल्पनेला देशातील 140 कोटी जनता सहभागी होत आहे.
स्वच्छता राखल्यास आपले आरोग्य पर्यावरण चांगले राहू शकते आणि त्याचा फायदा सर्वांना होऊ शकतो,त्यासाठी यापुढे प्रत्येक नागरिकांनी प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक बाटली न वापरण्याचा संकल्प करावा असे आवाहन केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शेवटी केले आहे .
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात पाच प्रभाग समिती अंतर्गत 23 वॉर्डमध्ये 46 ठिकाणी, तसेच डॉ. बुशरा यांचे मार्गदर्शनाखाली सर्व 15 प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता मोहीम रबविण्यात आली. यामध्ये भिवंडी वैद्यकीय आरोग्य संघटना डॉ.उज्वला बर्दापूरकर तसेच नवी वस्ती परिसरात इंजिनीयर आर्किटेक असोसिएशनचे पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक संघटना, पालिका कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या स्वच्छता अभियानास सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली असून,या उपक्रमास भिवंडीकर नागरीक, स्वयंसेवी संस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्या बद्दल पालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांचे आभार व्यक्त करीत, स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, आपण सर्वांनी दैनंदिन स्वच्छतेची सवय लावून घेणे आवश्यक आहे,ओला कचरा व सुका कचरा वेगळा करणे, कचरा कचरा कुंडीतच टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे सिंगल युज प्लास्टिकचा टाळणे हे अपेक्षित आहे, असे नागरिकांना आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.विशेष स्वच्छता अभियान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालिका अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
