भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत जुनादुरखी येथे स्वच्छता रन कार्यक्रमाचे आयोजन (दि. २४ सप्टेंबर २०२३) रोजी करण्यात आले होते यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छतेची शपथ घेऊन गावातील शाळेतील विद्यार्थी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक यांच्या वतीने स्वच्छता स्वच्छता रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भिवंडी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी श्री. सुधाकर सोनवणे तसेच जुना दुर्खीचे सरपंच श्री. वसंत पाटील यांनी स्वच्छता रंगला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. गावातील महत्त्वाच्या ठिकाणापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत स्वच्छता रन धावण्यात आली तसेच यावेळी स्वच्छता रन या कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी स्वच्छतेच्या माध्यमातून गाव नेहमी स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्याचे सरपंच यांनी ग्रामस्थांच्या वतीने निर्धार व्यक्त केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व नागरिक ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा व तालुका सर्व अधिकारी कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचाच एक भाग म्हणून कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक पाणीपुरवठा स्वच्छता विभाग श्री. दादाभाऊ गुंजाळ हे स्वच्छता रन कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता रन यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जानजागृत होऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावे कचरामुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत 15 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत जिल्हा परिषदेच्या वतीने गावागावात जानजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचे महत्व गावातील ग्रामस्थांना व जिल्ह्यातील सर्व गावे कचरामुक्त होऊन स्वच्छ व सुंदर यासाठी स्वच्छतेचे महत्व ग्रामस्थांना व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता रन चे आयोजन (दि. २४ सप्टेंबर २०२३) रोजी करण्यात आले यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य, जिल्हा व तालुका अधिकारी व कर्मचारी, शाळेतील मुले एनएसएस चे विद्यार्थी यांनी स्वच्छता उपक्रम सहभाग नोंदवून जास्तीत जास्त गाव कचरा मुक्त करून स्वच्छ सुंदर कण्यासाठी प्रयत्न करण्याचे ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छत रन उपक्रमातून दिसून आले.
