राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमधील ज्ञान, कौशल्य व मुल्य यांच्या विकारानाकरिता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका व श्री अरविंदो सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी महानगरापालिका हद्दीतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन स्व. राजय्या गाजेंगी हॉल, संगमपडा, भिवंडी येथे दि.२०/०४/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दु. ४.०० वाजेपर्यंत करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलीत करुन करण्यात आली, यावेळी महानगरपालिकेचे दिपक पुजारी उप-आयुक्त (मुख्यालय), प्रणाली घोंगे उप-आयुक्त (शिक्षण), रमेश थोरात सहा. आयुक्त तथा प्रशासन अधिकारी, जितेंद्र हेडाऊ, कार्यालयीन अधिक्षक, प्रथमिक शिक्षण विभाग, सिमी महाजन, संचालक अरबिंदो सोसायटी आणि मुख्य मानव संसाधन अधिकारी व अरविंदो सोसायटीचे शशांक श्रीवास्तव, निखील टॅबुलकर, विकास कुमार व मोहिनी गुरव हे उपस्थित होते. या सर्वाच्या उपस्थितीत सर्वप्रथम दिप प्रज्वलीन करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी दिपक पुजारी उप-आयुक्त (मुख्यालय) म्हटले की, अशा प्रकाराचे प्रशिक्षण देऊन शिक्षण सुधारण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या कार्यकेमांपैकी एक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम शिक्षकांना भारताच्या उज्वल भविष्यासाठी योगदान देऊ शकतील विध्यार्थाना विकसित करण्यास सक्षम करेल. असे कार्यक्रम व्हायलाय पाहीजे. यावेळी अरबिंदो सोसायटी यांचे आभार मानले.
या प्रसंगी भिवंडी महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांचे मुख्याध्यपक व शिक्षक वर्ग फार मोठ्या संखेने उपस्थित होते.